Mopa Airport: मोपा येथील विमानतळाच्या उभारणीसाठी कोणत्या कंपनीचे, किती प्रमाणात वापरले स्टील?

मोपा येथील मनोहर विमानतळाचे बांधकाम जीएमआर कंपनीने केले आहे.
Mopa Airport|Manohar International Airport
Mopa Airport|Manohar International AirportDainik Gomantak

Manohar International Airport in Mopa: उत्तर गोव्यात मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी 11 डिसेंबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर म्हणजेच 05 जानेवारी रोजी विमानळावरून विमान प्रवाशी वाहतूक सुरू झाली.

दाबोळीसह गोव्यात नव्याने झालेले मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्याच्या पर्यटनात भर टाकेल असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटनावेळी केले.

मोपा येथील मनोहर विमानतळाचे बांधकाम जीएमआर कंपनीने केले आहे. 2016 साली मोदींच्या हस्ते पायाभरणी झाल्यानंतर विक्रमी वेळात हे विमानतळ पूर्ण झाले आहे. सहा वर्षांत काम पूर्ण होऊन विमानतळ सेवेत रूजू झाले आहे.

कोणत्या कंपनीचे किती प्रमाणात वापरले स्टील?

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी टाटा स्टीलला मोठी ऑर्डर मिळाली होती. उत्तर गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामासाठी टाटा स्टीलने 2,200 दशलक्ष टन टाटा स्ट्रक्चरा पोकळ स्टील उत्पादनाचा पुरवठा केला आहे.

यातूनच नवे विमानतळ उभारण्यात आले आहे. कंपनीने देखील याबाबत अधिकृत माहिती देखील शेअर केली आहे.

Mopa Airport|Manohar International Airport
Science Fiesta 2023: मिरामार येथील विज्ञान केंद्रात शनिवारपासून विज्ञान महोत्सव, जाणून घ्या वेळापत्रक

दरम्यान, मोपा विमानतळासाठी 2,870 कोटी रूपये खर्च करण्यात आले असून, 2,132 एकर जमिनीवर हे विमानतळ उभारण्यात आले आहे.

2016 साली पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती. देश विदेशातील अनेक विमान कंपन्यांनी मोपा विमानतळावरून उड्डाणे सुरू केली आहेत.

तसेच, हच व्हेंचर्स आणि ब्लेड अर्बन एअर मोबिलिटी इंक यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या फ्लायब्लेड इंडिया (ब्लेड इंडिया) यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13 फेब्रुवारीपासून प्रवाशांसाठी सेवा सुरू केली आहे.

आठवड्यातील सहा दिवस प्रवाशांना विमानतळावरून दक्षिण गोव्यातील ताज एक्झॉटिकापर्यंत जाण्यासाठी केवळ 6000 रुपयांमध्ये हेलिकॉप्टरमध्ये आसन नोंदणी करता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com