प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती रोखणार कशा?

गोव्यातील काही चित्रशाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जात आहेत
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती रोखणार कशा?
How to stop plaster of Paris Ganesh statues Dainik Gomantak

मोरजी: गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) काळात मागणी तसा पुरवठा करण्याची तयारी काही मूर्तीकार ठेवतात. तसेच काही गणेश भक्तांनाही कमी वजनाच्या पण मोठ्या आकाराच्या मूर्ती हवी असते. त्यामुळे पेडणे तालुक्यासह राज्यातील काही चित्रशाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जात आहेत.

स्थानिक गणेश मूर्तीकारांना एका गणेश मूर्तीमागे सरकार 100 रुपये अनुदान देते. परंतु काही मूर्तीकारांच्या शाळेत हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच मातीच्या मूर्ती असतात, तर मोठ्या संख्येने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नजरेस पडतात.

आज पारंपरिक मातीपासून मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांना पीओपीमुळे मोठी स्पर्धा करावी लागते. पीओपी गणेशमूर्तींमुळे अनेकांवर संकट आले आहे. गावागावांतील काही मूर्तीकार स्वत: मूर्ती बनवण्याऐवजी कोल्हापूर येथून पीओपीच्या शेकडो मूर्ती आणून विकतात. त्यामुळे पर्यावरणाची समस्या वाढत आहे.

How to stop plaster of Paris Ganesh statues
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पुजाऱ्यांची टंचाई

प्रदूषण नियंत्रण महामंडळ काय करते?

पर्यावरणाला बाधा पोहोचू नये, यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ कार्यरत आहे. मात्र, अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून प्रदूषण टाळता येईल का, असा सवाल काही पारंपरिक मूर्तीकार विचारत आहेत. आज बाजारात, चित्रशाळांत पीओपीच्या मूर्ती सर्रास विक्रीला ठेवलेल्या आढळून येतात. त्यावर कारवाई कोण करणार? अशी स्थिती आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तोंडी तक्रार दिली तर ते अधिकारी म्हणतात तुम्ही लेखी तक्रारी द्या. गावात एखाद्याने पीओपी मूर्ती विक्रीविरोधात तक्रार दिली तर तक्रारदारांच्याच विरोधात वातावरण तयार होते. तंटे होतात. अशावेळी अधिकाऱ्यांनी चित्रशाळांमध्ये जाऊन गणेशमूर्तींची तपासणी करून पीओपी मूर्ती विकणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. ही कारवाई प्रदूषण महामंडळ करील काय, अशी अपेशा मूर्तीकार करत आहेत.

How to stop plaster of Paris Ganesh statues
Ganesh Chaturthi 2021: गणपतीला "दूर्वा" का वाहता?

आमची कुणाच्याच विरोधात तक्रार नाही. मात्र, प्रत्येक कलाकाराने आणि नागरिकांनीही प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मातीच्या मूर्ती पूजाव्यात. हल्ली हलक्या मूर्ती आणि आकर्षक पीओपीच्या मूर्तींना नागरिकच प्रतिसाद देतात. मग मूर्तीकार तरी काय करणार ?

- श्रद्धा गवंडी, मूर्तीकार

मातीच्या मूर्ती साकारायला मेहनत आणि वेळ लागतो. मात्र, पीओपीच्या मूर्तीसाठी वेळ लागत नाही. उलट ती वजनाने हलकी व रंगकामासाठी सोपी असते. अनेक चित्रशाळांमध्ये, गावागावांत पीओपीच्या मूर्ती पोचलेल्या आहेत. मात्र, आमच्या चित्रशाळेत दरवर्षी केवळ मातीच्या गणेश मूर्ती बनवल्या जातात. पण अनेक ठिकाणी मूर्तीकार पीओपीचा वापर करतात.

- उमाकांत पोके, मूर्तीकार

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com