गोव्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गला ऑक्सिजनचा चा पुरवठा कसा करणार?

How will Goa CM Pramod Sawant supply oxygen to Sindhudurg
How will Goa CM Pramod Sawant supply oxygen to Sindhudurg

सासष्टी: सरकारला लोकांची काळजी  नाही.  गोव्यात(Goa) ऑक्सिजन(Oxygen) तुटवडा असताना तो सिंधुदुर्गला पुरविण्याचे मुख्यमंत्री सावंत(Pramod Sawant) यांनी दिलेले आश्वासन आमचा दावा खरा ठरवत आहे. रुग्णांचे ऑक्सिजनअभावी हाल होत असताना मुख्यमंत्री सिंधुदुर्गला(Sindhudurag) कुठला पुरवठा करणार हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत(Digambar Kamat) यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे(Maharashtra) आमदार दीपक केसरकर यांना सिंधुदुर्गला गोव्यातून ऑक्सिजन देण्याचे आश्वासन दिले आहे.(How will Goa CM Pramod Sawant supply oxygen to Sindhudurg)

गोव्यात कोविडबाधित रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. गोमेकॉ इस्पितळातील डॉक्टर ऑक्सिजनच्या एका सिलिंडरवर तीन रुग्णांना प्राणवायू पुरवत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना सिलिंडरसाठी धावपळ करावी लागत आहे. कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत करून लोकांना ऑक्सिजनचे सिलिंडर पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले. 

सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून गोव्यातील प्राणवायू पुरवठा पाहणी करण्याची सरकारकडे मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. गोवा सरकारने पंतप्रधान कार्यालयाने मागितलेला प्राणवायूसंबंधीचा अहवाल जाहीर करावा. सरकार प्राणवायू व्यवस्थापनावर श्वेतपत्रिका काढण्यास का घाबरते, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणीही दिगंबर कामत यांनी केली आहे. जर सरकारने आताच पावले उचलली नाही तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गोव्यात जे मृत्यू होतील त्याला भाजप सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com