International Women's Day: ‘स्वयंपूर्णा सन्मान’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : महिलांनी आत्मसन्मानाने जगावे
Goa Government| CM Pramod Sawant
Goa Government| CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant International Women's Day: महिलांनी स्वतःची शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्‍यांच्‍यासाठी सुरक्षिततेचे वातावरण तयार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. महिलांना सन्मानाने जगता येईल यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

सरकारच्या सांख्यिकी विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या ‘स्वयंपूर्णा सन्मान’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. दिव्‍या राणे, जेनिफर मोन्सेरात, दिलायला लोबो व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देणाऱ्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ या प्रमुख कार्यक्रमाअंतर्गत गोवा सरकारने ‘स्वयंपूर्णा सन्मान’चे आयोजन केले आहे.

कर्ज, उच्च कौशल्य, शिक्षण किंवा स्वयंउद्योजकता अशा कोणत्याही स्तरावर उपाय शोधणाऱ्या महिलांना माहितीपूर्ण आणि संसाधनात्मक मदत देण्याच्या स्वयंपूर्णा मित्रांच्या प्रयत्नांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

Goa Government| CM Pramod Sawant
Goa Forward: सुलक्षणा सावंत यांनी अभ्‍यास करूनच बोलावे किंवा तोंड बंद ठेवावे : सय्‍यद

वूमन ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, अर्चिता शिरोडकर (वेटलिफ्टिंग), स्नेहा यादव, समृद्धी पाटील (तायक्वांदो), साक्षी काळे (पॅरा ॲथलेटिक्स), विंझिया परेरा, इमा पाटील (खेलो इंडिया : कॅडेट्स), डॉ. सिक्लेटिका रेबेलो (बॅडमिंटन),

बबिता झोरो, दीपा डेगवेकर आणि आफिरा आंद्रादे (कृषी नर्सरी), डॉ. अदुजा नाईक (मशरुम लागवड), भारती नाईक, अनिता नाईक, रमी वरक, संगीता ढोरे (दुग्धव्यवसाय), सुरेखा चोडणकर , मेघना नाईक (सामाजिक), सोनिया आरोंदेकर (कराटे),

आकांक्षा नाईक (नर्सिंग), रसिका खांडेपारकर (राष्ट्रपतींकडून पुरस्कारप्राप्त), रशिदा मुजावर, वीरा नाईक (भरतकाम), श्वेता गावकर (गिर्यारोहक), प्रीती सडेकर, सुनीता सावंत, श्रुती पुजारी (व्यावसायिक), रंजिता पै (राज्य महिला आयोग अध्यक्षा), अँजेलिका दा सिल्वा (मुख्य अभियंता), रिचा गोवेकर (वैमानिक), गौरी ढवळीकर,

नीलम मराठे (योग शिक्षिका), माली परवार (आर्टिस्ट), इंदुमती चितारी ( कलाकार), ममता वळवईकर, प्रमिला फर्नांडिस (टेक्निशियन), वर्मा डिमेलो (फॅशन डिझायनर) आणि फिलू मार्टिन्स (कुणबी साडीतील योगदान) यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com