दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतूक कोंडी, पोलिसांची दमछाक

Huge traffic seen at Dabolim International Airport
Huge traffic seen at Dabolim International Airport Dainik Gomantak

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (दि.25) मोठी वाहतूक कोंडी झाली. (Huge Traffic Jam at Dabolim International Airport ) पोलिस आणि वाहतूक कर्मचार्‍यांचा बंदोबस्त असतानाही विमानतळार वाहतूक कोंडी पहायला मिळाली. यामुळे टॅक्सी चालक आणि प्रवाशांमध्ये, आगमन आणि निर्गमन गेटवर चांगलाच गोंधळ उडाला. वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची दमछाक झाली.

Huge traffic seen at Dabolim International Airport
Chess Olympiad: ग्रँडमास्टर अनुराग म्हामल अंगोला देशाच्या प्रशिक्षकपदी

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी 12 ते सायंकाळी 06 या वेळेत विमानतळावर विमानांच्या आगमन व निर्गमनाची वेळ असते. या वेळेत शेकडो प्रवासांची ये - जा सुरू असल्याने वाहतूक रहदारी अधिक प्रमाणात होत असते. सोमवारी दुपारी देखील विमानतळावर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. वाहतूक कोंडीमुळे टॅक्सी चालक आणि प्रवाशांमध्ये, आगमन आणि निर्गमन गेटवर गोंधळ उडाला.

विमानतळाच्या प्रवेशद्वारावर रेंट-अ-कॅब वाहनांची बेकायदेशीर पार्किंग हे वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहे. दाबोळी विमानतळावर प्रवेश करणार्‍या टॅक्सी आणि इतर वाहने योग्य लेन पाळण्यात अपयशी ठरतात, ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. सदर परिस्थिती नियंत्रणात आणताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com