Goa Harassment Case: फ्लॉईड कुतीन्हो कथित छळ प्रकरण; धनिया, एकोस्कर यांच्या चौकशीचे आदेश

आपल्या विरोधात एकाही कोर्टात वॉरंट जारी केलेले नसताना केंद्राच्या आयबी विभागाला खोटी माहिती देऊन आपल्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याचा आरोप व्यवसायिक फ्लोईड कुतीन्हो यांनी केलाय.
Goa
Goa Dainik Gomantak

मडगाव (Margao) येथील व्यवसायिक फ्लोईड कुतीन्हो यांनी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया आणि उपअधिक्षक सागर एकोस्कर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. (Goa Harassment Case)

आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक जसपाल सिंग (DGP Jaspal Singh) यांना दिले आहेत.

आपल्या विरोधात एकाही कोर्टात वॉरंट जारी केलेले नसताना केंद्राच्या आयबी विभागाला खोटी माहिती देऊन आपल्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याचा आरोप व्यवसायिक फ्लोईड कुतीन्हो यांनी केलाय.

Goa
Goa Crime: 3.5 लाखांच्या ब्रेसलेट चोरीचा प्रयत्न फसला

आयोगाचे अध्यक्ष उत्कर्ष बाक्रे यांनी हा आदेश जारी केला असून 06 फेब्रुवारी पर्यंत आपल्यापुढे चौकशीचा अहवाल सदर करावा असे म्हटले आहे. दरम्यान कुतीन्हो यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला या बाबतीत तक्रार केली होती.

तिचीही दखल घेत या प्रकरणी पोलीस (Goa Police) महसंचालकांनी चौकशी करावी अशी शिफारस करणारे पत्र राज्य गृह खात्याचे (Home Ministry) अव्वल सचिव विवेक नाईक यांनी पाठविले आहे.

Goa
Goa Gold Scam: पणजीतील दागिने विक्रेत्याची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

सागर एकोस्कर हे मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक असताना आपल्याला एका खोट्या प्रकरणात गुंतविल्याचा आरोप कुतीन्हो यांनी केला आहे.

पोलीस अधिक्षक धनिया यांनी आयबीला आपल्या विरोधात मडगाव न्यायालयात वॉरंट प्रलंबित असल्याची खोटी माहिती पुरवून आपल्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यास भाग पाडले असा आरोप आपल्या तक्रारीत त्यांनी केला होता.

ही नोटिस जारी केल्यामुळे कुतीन्हो हे मागचे वर्षभर इंग्लंडमध्ये अडकून पडले असून आपल्या विरोधातील ही लूक आऊट नोटीस मागे घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com