पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पतीची निर्दोष सुटका

दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट सिल्वा (Vincent Silva) यांनी केपे येथील शाहिदाद शेख (Shahidad Sheikh) याला आज निर्दोष मुक्त केले.
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पतीची निर्दोष सुटका
CourtDainik Gomantak

मडगाव: हुंड्यासाठी आपल्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपात तथ्य न आढळून आल्याने दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट सिल्वा (Vincent Silva) यांनी केपे येथील शाहिदाद शेख (Shahidad Sheikh) याला आज निर्दोष मुक्त केले.

Court
आसामी युवती बलात्कार प्रकरणातील सुधाकर नाईकचा जामीन मंजूर

शाहिदाद शेख याची पत्नी असिफा शेख हिने 27 जून 2016 रोजी आपल्या पतीच्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. आसिफाच्या वडिलांनी आपल्या मुलीचा हुंड्यासाठी तिच्या पतीकडून मानसिक व शारीरिक छळ होत होता. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप करून केपे पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात पोलिसांनी संशयिता विरोधात भादंसंच्या 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) 304 ब (हुंडाबळी) आणि 498 अ (छळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडणे) या गुन्ह्याखाली खटला दाखल केला होता. या प्रकरणी 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली मात्र त्यात संशयितावरील आरोप सिद्ध करता आले नाहीत. संशयिताच्या वतीने एड. अमेय प्रभुदेसाई यांनी बाजू मांडली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com