भारतीय पर्यटन एचव्हीएस क्षेत्रातील ‘ANAROCK HOPE 2023’चा समारोप

परिषदेत भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्रातील नामांकित प्रतिनिधींनी एकत्र येत विचार मांडले
HVS ANAROCK HOPE Conference 2023
HVS ANAROCK HOPE Conference 2023Dainik Gomantak

HVS ANAROCK HOPE Conference 2023: भविष्यातील सर्वंकष, सर्वांगीण विकासाबाबत ताज रिसॉर्ट अँड कन्व्हेन्शन सेंटर-गोवा येथे दोन दिवसांच्या विचारमंथनानंतर भारतातील खास हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठीची परिषद म्हणून ओळख असलेल्या ‘एचव्हीएस ॲनारॉक होप 2023’ची सांगता झाली.

जागतिक पर्यटन व्यवसाय क्षेत्रातील पॉवरहाउस म्हणून भारताची जागतिक ओळख सादर करतानाच होप (हॉस्पिटॅलिटी ओव्हरव्ह्यू प्रेझेन्टेशन अँड एक्स्चेंज)च्या या दोन दिवसीय परिषदेत भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्रातील नामांकित प्रतिनिधींनी एकत्र येत विचार मांडले.

नव्या व्यावसायिक संबंधांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या परिषदेमध्ये हॉस्पिटॅलिटी आणि प्रवाससेवा क्षेत्रातील निमंत्रित प्रतिनिधी, देशातील तसेच आंतरराष्ट्रीय हॉटेल साखळ्यांचे मालक, चालक, गुंतवणूकदार, ट्रॅव्हल गुरू, विचारवंत व धोरणकर्ते सहभागी झाले होते.

HVS ANAROCK HOPE Conference 2023
Sadetod Nayak : धक्कादायक! २५ वर्षांखालील युवतीही बनताहेत हृदयरोगी

या वार्षिक उपक्रमामध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला नवी दिशा देतानाच नवे व्यावसायिक संबंध स्थापित करण्यास प्रोत्साहन दिले गेले. परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ बीजभाषणाने झाला. इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक बागला यांनी ‘भारताची कथा: ना मिथ्य केवळ तथ्य’ या विषयावर विचार मांडले.

"होप परिषद आणि हॅशटॅग पुरस्कार सोहळ्यास मिळालेला प्रतिसाद आणि गत दोन दिवसांत झालेल्या विचारमंथनातून समोर आलेल्या अनेक सकारात्मक बाबी याबाबत आम्ही समाधानी आहोत."

"हॅशटॅग पुरस्कार विजेत्यांचे मी एकदा अभिनंदन करतो. तसेच या परिषदेस जगभरातून आलेले वक्ते, अतिथी व प्रतिनिधी यांनी दिलेल्या योगदानासाठी व सहभागासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो."

- मनदीप लांबा, एचव्हीएस ॲनारॉकचे अध्यक्ष (दक्षिण अशिया)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com