Hyderabad Police: Drugs प्रकरणी हैदराबाद पोलिस पथक लवकरच गोव्यात

Goa Drugs Case: आरोप-प्रत्यारोपाच्या वादळानंतर गोवा पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा
Hyderabad Police
Hyderabad PoliceDainik Gomantak

Panjim: हैद्राबादमध्ये ड्रग्जप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये गोव्यातील ड्रग्ज दलालांचे लागेबांधे असल्याचे तपासकामात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात गोव्यातील एका अटक केली असून अधिक तपासासाठी हैद्राबाद पोलिसांचे पथक (Hyderabad Police Squad) पुढील आठवड्यात गोव्यात येत आहे. यासंदर्भातची माहिती गोव्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

गोवा पोलिस महासंचालकांशी हैद्राबाद पोलिस आयुक्तांनी संपर्क साधून ते तपासकामानिमित्त गोव्यात येत असल्याची कल्पना दिली आहे तसेच सहकार्य मागितले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील ड्रग्ज दलाल व विक्रेत्यांना गोवा पोलिस पाठिशी घालत असून त्यांना पकडून देण्यास मदत करत नसल्याचा आरोप हैद्राबाद पोलिसांनी केला होता तेव्हा पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी तो फेटाळून लावला होता. त्याला त्यानंतर आयुक्तांनी उत्तर दिले नाही.

Hyderabad Police
FIFA World Cup: सर्व फुटबॉल मैदाने 20 सप्टेंबर पर्यंत फिफाच्या हवाली करणार - क्रिडामंत्री

गोवा व हैद्राबाद पोलिस अधिकाऱ्यांमध्ये गोव्यातील किनारी भागातील ड्रग्ज विक्रेत्यांच्या अटकेवरून वाद निर्माण झाला होता. फोगाट मृत्यू प्रकरणात हणजूण पोलिसांनी अटक केलेला एडविन नुनीस हा ड्रग्जमध्ये असल्याची माहिती गोवा पोलिसांना देऊनही त्याला चौकशीसाठी गोवा पोलिसांनी दिले नसल्याचा दावा हैद्राबाद पोलिसांनी केल्यावर आरोप-प्रत्यारोपाचे वादळ उठले होते.

Hyderabad Police
Colvale Jail: कोलवाळ कारागृहात जेलर अन् जेल रक्षक भिडले; रक्षक गंभीर जखमी

हैद्राबाद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हणजूण येथील प्रितेश बोरकर याला ड्रग्जप्रकरणी गोव्यातील पोलिसांना कोणतीही कल्पना न देता ताब्यात घेऊन हैद्राबादला घेऊन गेले होते. त्याच्या कुटुंबियांनी हणजूण पोलिसांमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हैद्राबाद पोलिसांनी त्याच्या अटकेची माहिती गोवा पोलिसांना कळविल्यावर हे प्रकरण उघडकीस आले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर बऱ्याचा दिवसांनी त्याला अटक केल्याचे दाखवण्यात आले होते.

Hyderabad Police
Dabolim विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांचा प्रवाशांना त्रास; NGO चे आयुक्तांना निवेदन

पोलिस चौकशी करणार: हैद्राबाद पोलिसांनी ड्रग्जप्रकरणी काही संशयितांना अटक केली होती. त्यामध्ये त्यांनी गोव्यातील ड्रग्जशी संबंधित असलेल्या दलाल व विक्रेत्यांची नावे घेतली होती. त्यामध्ये प्रितेश नाव समोर आले होते. हैद्राबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी नोंद केलेल्या प्रकरणामध्ये गोव्यातील काही ड्रग्ज दलाल व विक्रेत्यांचा समावेश असल्याने ते गोव्यात चौकशीसाठी येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com