अन्न पुरवताना स्वच्छता महत्त्वाची : राजशेखर

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त कार्यक्रम
अन्न पुरवताना स्वच्छता महत्त्वाची : राजशेखर
Food Safety Day Dainik Gomantak

पणजी : राज्यातील काही अन्नपदार्थांची वेगळी ओळख आहे. त्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना त्यांचे आकर्षण असते. हे अन्न पुरविताना स्वच्छताही महत्त्वाची आहे, त्यासाठी अन्न पदार्थ विक्री व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाने स्वच्छतेविषयीचे प्रमाणपत्र आपल्या आस्थापनात लावणे आवश्‍यक आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही विश्‍वास निर्माण होण्यास मदत होते, असे मत आरोग्य खात्याचे सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर यांनी व्यक्त केले.

Food Safety Day
मुरगावात स्वच्छ अभियानाचे वाजले तीनतेरा

अन्न व औषध प्रशासनाने, आरोग्य खाते, तसेच महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासनाच्या संचालक ज्योती सरदेसाई, महिला व बालकल्याण खात्याच्या संचालक दीपाली नाईक, महापालिकेचे आयुक्त आग्नेलो फर्नांडिस, रिचर्ड नोरोन्हा यांची उपस्थित होती.

मान्यवरांच्या हस्ते जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. उत्तम आहार (उत्तर गोवा व दक्षिण गोवा) जिल्हा आव्हान -२ या उपक्रमाचा शुभारंभही मान्यवरांनी केला. महापालिका आयुक्त आग्नेलो फर्नांडिस यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळा

अनेक हॉटेलमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेलात पदार्थ तळले जातात. सध्या फास्टफुडकडे लोकांचा अधिक कल असतो. तेलातील टोटल पोलर कंपाऊंड (टीपीसी) मूल्य हे 25 पेक्षा जास्त असता कामा नये. पदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेल तीनवेळा वापरता येते, त्यापेक्षा जास्त वापरू नये, असा नियम आहे. परंतु अनेक ठिकाणी खरोखरच तीन पेक्षा जास्तवेळा तेलाचा वापर होत असल्याचे चित्र दिसते. त्यावर आळा कसा घालणार, हाही प्रश्‍न आहे. अशा तेलाविषयीच्या वापरावर मान्यवरांनीही आपल्या भाषणात उल्लेख केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com