माझी प्रकृती ठीक; काळजीचे कारण नाही: सभापती राजेश पाटणेकर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

सभापती पाटणेकर यांना गोमेकॉत दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताने सकाळपासून डिचोलीत उलटसुलट चर्चा सुरू होती. प्रत्येकजण एकमेकांकडे तसेच त्यांच्या कुटुंबियांतील व्यक्‍तीकडे संपर्क साधून चौकशी करीत होते. मात्र, काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे समजताच, चर्चेला पूर्णविराम मिळाला.

डिचोली: डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर हे तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले असून, त्यांची प्रकृती ठिक आहे. तपासणी करून ते दोन दिवसात घरी परतणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. खुद्‌द सभापतींनी समाज माध्यमावरून आपण ठिक असल्याचे स्पष्ट केले आहे.  

सभापती पाटणेकर यांना गोमेकॉत दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताने सकाळपासून डिचोलीत उलटसुलट चर्चा सुरू होती. प्रत्येकजण एकमेकांकडे तसेच त्यांच्या कुटुंबियांतील व्यक्‍तीकडे संपर्क साधून चौकशी करीत होते. मात्र, काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे समजताच, चर्चेला पूर्णविराम मिळाला. उपलब्ध माहितीनुसार सभापती पाटणेकर यांना हृदयविकाराशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वीच त्यांनी तपासणीसाठी गोमेकॉतील डॉक्‍टरांशी भेट पूर्वनिश्‍चित केली होती. त्यानुसार ते आपल्या मुलासमवेत आज सकाळी गोमेकॉत गेले असता, त्यांना त्रास जाणवू लागल्याने तपासणीसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. विविध तपासण्या करून त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, पाटणेकर गोमेकॉत दाखल झाल्याचे समजताच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे, डॉ. शेखर साळकर आदींनी गोमेकॉत जाऊन सभापती पाटणेकर यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या