चोकाराम गर्ग नवे राज्य निवडणूक आयुक्त

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

कोरोना महामारीमुळे होऊ न शकलेल्या जिल्हा पंचायती व नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा राज्य निवडणूक आयुक्त रिक्त झालेल्या पदावर २००८ मधील आयएएस अधिकारी चोकाराम गर्ग यांची नियुक्ती केली आहे. सध्या त्यांच्याकडे कायदा तसेच कला व संस्कती खात्याच्या सचिवपदाचा ताबा आहे. 

पणजी  : कोरोना महामारीमुळे होऊ न शकलेल्या जिल्हा पंचायती व नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा राज्य निवडणूक आयुक्त रिक्त झालेल्या पदावर २००८ मधील आयएएस अधिकारी चोकाराम गर्ग यांची नियुक्ती केली आहे. सध्या त्यांच्याकडे कायदा तसेच कला व संस्कती खात्याच्या सचिवपदाचा ताबा आहे. 

राज्यात जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, कोविड महामारीमुळे या निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत अशा स्थितीत आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी त्यांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यांचा राजीनामा पत्रही सरकारने त्वरित स्वीकारून येत्या काळात जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुका घ्यावा लागणार असल्याने सरकारने या पदावर चोका गर्ग यांची वर्णी लावली आहे. 

दरम्यान, गेल्या मार्च २०२० मध्ये जिल्हा पंचायतीची मुदत संपली आहे, तर हल्लीच राज्यातील ११ नगरपालिकांचीही मुदत दोन दिवसांपूर्वी संपली. त्यामुळे जिल्हा पंचायत व नगरपालिकांवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. बिहारमध्ये निवडणुका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने गोवा सरकारनेही येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्थगित ठेवण्यात आलेली जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. या निवडणुकीनंतर पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नगरपालिकेचा निवडणुका होण्याची संभावना आहे.

संबंधित बातम्या