आयएएस मिहीर वर्धन  यांची गोव्यात बदली 

विलास महाडिक
शनिवार, 11 जुलै 2020

गोव्यात असताना ते २०१४ पर्यंत उत्तर गोवा जिल्हाधिकारी होते. ते आयएएस अधिकारी झाल्यावर त्यांची गोव्यातून पाँडिचेरी येथे बदली झाली होती.

पणजी

लक्ष्यद्विप येथील आयएएस अधिकारी मिहीर वर्धन यांची गोव्यात बदली झाली आहे तर त्यांच्या जागी गोव्यातील आयएएस अधिकारी पी. कृष्णमूर्ती यांची बदली झाली आहे. हा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काढला. 
मिहीर वर्धन हे २००३ मध्ये अग्मूट केडरमधून आयएएस अधिकारी झाले होते त्यावेळी ते गोव्यात होते. गोव्यात असताना ते २०१४ पर्यंत उत्तर गोवा जिल्हाधिकारी होते. ते आयएएस अधिकारी झाल्यावर त्यांची गोव्यातून पाँडिचेरी येथे बदली झाली होती. त्यानंतर त्यांची लक्ष्यद्वीप येथे बदली झाली होती. गोव्याचे दिल्लीतील निवासी आयुक्त पी. कृष्णमूर्ती हे सध्या कार्यरत होते. ते माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जवळचे अधिकारी होते. मात्र पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांची गोव्याच्या दिल्लीतील निवासाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या