स्वयंपूर्ण गोव्याची जबाबदारी आता आयएएस अधिकाऱ्यांकडे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केल्यानंतर त्याला पूरक अशी स्वयंपूर्ण गोवा घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

पणजी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केल्यानंतर त्याला पूरक अशी स्वयंपूर्ण गोवा घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. प्रत्येक गाव आपल्या गरजांबाबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आता गावागावात जाणार आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे पाच ते सात गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.

आयएएस अधिकाऱ्यांसोबत भारतीय वन सेवा आणि राज्याच्या सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही काही गावांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव परीमल राय यांनी गावांची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे देणारा आदेश आज जारी केला. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक गावासाठी एक स्वयंपूर्ण मित्र नियुक्त केला आहे. त्याशिवाय खातेप्रमुख, मंत्री व आयएसएस अधिकाऱ्यांनी गावाला भेट द्यावी व मार्गदर्शन करावे असे नियोजन केले आहे. या अधिकाऱ्यांकडे पाच ते आठ गावांची जबाबदारी दिली आहे. हे सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्त्‍व सांभाळतील. स्वयंपूर्ण गावांसाठी १५ कलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात माहितीचे संकलन, विश्लेषण असे होणार असले तरी त्यानंतरच्या टप्प्यात मनुष्यबळाच्या विकासावर भर असेल.

अधिकाऱ्यांकडे दिलेली जबाबदारी...
राय यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, बार्देश तालुक्यासाठी रुपेश कुमार हे संघ प्रमुख म्हणून काम पाहतील. त्यांच्याकडे ९ गावांची जबाबदारी आहे. बार्देशमधील अन्य अधिकारी व गावांची संख्या अशी - जे. अशोक कुमार- ८,  संजय कुमार- ८, पद्माकर शेल्डरकर-८. संजय गिहार हे तिसवाडीचे संघ प्रमुख असून त्यांच्याकडे ६ गावांची जबाबदारी आहे. तिसवाडीची जबाबदारी असलेले अन्य अधिकारी व गावांची संख्या अशी - उमेश कुलकर्णी- ७,  मायकल डिसोझा- ६. डिचोली तालुक्याचे विवेक एच. पी. हे संघप्रमुख आहेत. त्यांच्याकडे ६ गावांची जबाबदारी आहे. या तालुक्यात संजीत रॉड्रिग्ज-६,  श्रीकांत पाटील-६ हे अन्य अधिकारी आहेत. पेडणे तालुक्यात कुणाल हे संघ प्रमुख असून त्यांच्याकडे ७ गावांची जबाबदारी आहे. या तालुक्यात यतींद्र मराळकर -७, डॉ. सुरेश शानभोग ६ हे अधिकारी कार्यरत असतील. सत्तरी तालुक्यातील ६-६ गावांची जबाबदारी सुरेश भंडारी व केशव कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील एकूण १०२ गावे पहिल्या टप्प्यात स्वयंपूर्ण गोवा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तालुका संघप्रमुख, अन्य अधिकारी जबाबदारी असलेल्या गावांची संख्या अशी - मुरगाव संजीव गडकर (संघप्रमुख)- ५,  राजेंद्र कामत -५. केपे- अंकिता आनंद (संघप्रमुख) - ६,  चैतन्य -५. सांगे सुभाष चंद्र (संघप्रमुख)-७. काणकोण संतोष कुमार (संघ प्रमुख)-७, धारबांदोडा - सौरभ कुमार -५,  फोंडा पी.एस. रेड्डी -७, तारीक थॉमस-६,  प्रसाद लोलयेकर-६. सासष्टी हेमंत कुमार (संघप्रमुख)-७,  वंदना राव -८, शशांक त्रिपाठी-८ आणि उल्हास केरकर -७.

संबंधित बातम्या