Curlie's Night Club: वादग्रस्त कर्लिस नाईट क्लब होणार जमीनदोस्त

राष्ट्रीय हरित लवादाने गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीचा शॅक पाडण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवला आहे.
Curlies Club | Sonali Phogat Case
Curlies Club | Sonali Phogat Case Dainik Gomantak

हणजूण येथील वादग्रस कर्लिस नाईट क्लब (Curlie's Night Club) पाडण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) कायम ठेवला आहे. त्यामुळे लवकरच वादग्रस्त कर्लिस नाईट क्लब जमीनदोस्त होणार आहे. अभिनेत्री आणि नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांना जबरदस्तीने अंमली देण्याचा प्रकार याचा बारमध्ये घडला, त्यानंतर कर्लिस पुन्हा चर्चेत आला.

Curlies Club | Sonali Phogat Case
Goa Weather Update: 12 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ज जारी

कर्लिस नाईट क्लबचा सहमालक लिनेट नुनीस (Linet Nunes) याने गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीच्या (GCZMA) आदेशाला आव्हान दिले होते. राष्ट्रीय हरित लवादाने नुनिस यांची याचिका फेटाळली असून, GCZMA (Goa Coastal Zone Management Authority's) 21 जुलै 2016 चा आदेश कायम ठेवला आहे. हरित लवादने हणजूण येथील कर्लिस बार जमीनदोस्त करून ती जागा पूर्वपत करण्याचे आदेश दिले आहेत.

कर्लिस बार पाडण्याबाबतची निर्णय GCZMA च्या जुलै महिन्यातील बैठकीत झाला होता. पण, क्लबचा सहमालक लिनेट नुनीस याने हरित लवादाकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे आणि नंतर उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाकडे सोपवले, आणि तुम्हीच निर्णय घ्या असे निर्देश दिले.

काशिनाथ शेट्ये यांनी याबाबत तक्रार दिली होती. कर्लिस बार सागरी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.

Curlies Club | Sonali Phogat Case
साल्वादोर द मुंद जमीन घोटाळ्याची चौकशी CBI किंवा ED कडे सोपवावी - रोहन खवंटे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com