धर्म क्रांतीचा आदर्श मानदंड ‘श्रीकृष्ण’: सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य म्हणाले, न थोर मंडळी तसेच युवकही अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, आपल्या देशासाठी, धर्मासाठी कार्य करताना दिसतात. आजच्या काळात प्रत्येकाने देशाचा विचार करणे आवश्यक आहे.

खांडोळा: आज जन्माष्टमीनिमित्त गीतेमध्ये जे शिक्षण दिले गेले आहे, त्या संस्कारांनी योग्य प्रकारे जगणे आवश्यक आहे. विचित्र परिस्थितीतही सत्याच्या मार्गावर लढा देत असताना श्रीकृष्णाची जाणीव होते. धर्मक्रांतीचा मानदंड भगवान श्रीकृष्ण होय. सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे संबोधन ब्रह्मेशानंदाचार्य यांनी तपोभूमी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमप्रसंगी केले.

 

ते पुढे म्हणाले, न थोर मंडळी तसेच युवकही अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, आपल्या देशासाठी, धर्मासाठी कार्य करताना दिसतात. आजच्या काळात प्रत्येकाने देशाचा विचार करणे आवश्यक आहे.

 

श्री दत्त पद्मनाभ पीठ आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा गोपाळकाला उत्सव श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर उत्साहात संपन्न झाला.

 

११ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त सद्‌गुरू महापूजा, गोकूळ पूजन तथा श्रीकृष्ण पूजन सुसंपन्न झाले. त्यानंतर टाळ, मृदंग व श्रीकृष्णांच्या गजरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 

 

बुधवारी गोपाळकाला उत्सव पूज्य स्वामीजींच्या सान्निध्यात तपोभूमी वैदिक गुरुकुल ब्रह्मवृंदांद्वारे साजरा करण्यात आला. यामध्ये गुरू पूजन श्रीकृष्ण महापूजा, गोपाळकाला उत्सव वेगवेगळे खेळ, फुगडी, कला सादर करून हा सोहळा मोठ्या आनंदाने श्रीक्षेत्र भूमीवर संपन्न झाला. त्यानंतर दहीहंडी, आरती, दर्शन व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या सर्व शिष्य, अनुयायांनी हा उत्सव घरोघरी साजरा करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी आशीर्वचन सादर केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या