'आमदार म्हणून निवडून आल्यास प्राधान्याने बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार'

पेडणे मतदार संघाचा (Pernem Constituency) आपण दौरा करतो किंवा प्रचारा दरम्यान घरोघरी जातो तेव्हा आई वडिलांची एकाच मागणी असते.
'आमदार म्हणून निवडून आल्यास प्राधान्याने बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार'
Praveen ArlekarDainik Gomantak

मोरजी: पेडणे मतदार संघाचा (Pernem Constituency) आपण दौरा करतो किंवा प्रचारा दरम्यान घरोघरी जातो तेव्हा आई वडिलांची एकाच मागणी असते. आमच्या मुलामुलींना नोकरी कधी मिळणार, नोकरीची मागणी 90 टक्के जनता घरोघरी गेल्यावर करतात. आपण आमदार म्हणून निवडून आल्यास प्राधान्य क्रमाने बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार आहे, यापूर्वीच्या निवडून आलेल्या आमदाराने जनतेसाठी काहीच केले नसल्याचा दावा मगोचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी इब्रामपूर येथे प्रचाराचा शुभारंभ करताना केले. इब्रामपूर (Ibrampur) येथे 20 ओजी श्री सातेरी मंदिर आणी चव्हाटा येथे नारळ ठेवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी वझरीच्या माजी सरपंच संगीता गावकर, इब्रामपूर माझी सरपंच अशोक धावूस्कर, मगो केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुदीप कोरगावकर (Sudip Korgaonkar) जयेश पालयेकर, राजन म्हापसेकर व समर्थक उपस्थित होते. यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना यापूर्वी आपण कोरगाव आणि धारगळ पंचायत क्षेत्रात दौरा संपला त्यावेळी केवळ नागरिकांच्या प्रमुख समस्या आहे त्या म्हणजे बेरोजगारीच्या असे आर्लेकर म्हणाले.

अभ्यास नसलेला मंत्री: संगीता गावकर

आम्ही या पूर्वी निवडून दिलेला आमदार हा अभ्यास करून न बोलणारा आमदार चुकीचा निवडून दिलेला आहे, हि चूक पुन्हा कदापही होणार नाही. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सध्या सूड भावनेनं वागत आहे एका स्त्री महिलेच्या विरोधात अभ्यास न करताच ते आरोप करत आहेत त्यामुळे पूर्ण स्त्री जातीचा हा अवमान आहे. त्याचा बदला 2022 च्या निवडणुकीत घेण्यात येणार असल्याचे संगीता गावकर म्हणाल्या.

Praveen Arlekar
भाजप सरकारने केला गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांचा स्वप्नभंग: दिगंबर कामत

अशोक धावूस्कर यांनी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) हे ज्या मंदिरांचे काम आम्ही अडवले म्हणतात ते चुकीचे आहे, कोणतेही टेंडर न काढता बेकायदा काम करणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित करून, आम्ही चुकीच्या आमदाराला निवडून दिल्यामुळे अशी भयानक स्थिती झाली ती आता बदलावी लागणार असे अशोक धावूस्कर यांनी सांगितले.

मगोचे केंद्रीय समितीचे सदस्य सुदीप कोरगावकर यांनी बोलताना भावूसाहेब बांदोडकर यांनी राज्याच्या विकासासाठी मोठमोठे प्रकल्प आणले, उर्वरित प्रकल्प शशिकला काकोडकर यांनी पूर्ण केले होते, मगो पक्षाला या दोन्ही नेत्यांची पुण्याई असल्याने आणि हा पक्ष या मातीतला असल्याने पुन्हा एकदा मतदार पेडणे मतदार संघासातून मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर याना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com