निवडून आलो तर बेरोजगारीच्या प्रश्नाला प्राधान्य देणार: काँग्रेसचे मेघ:श्याम राऊत

राऊत यांनी सोमवारी प्रचाराचा नारळ फोडला.
Congress

Congress

Dainik Gomantak 

डिचोली: येत्या निवडणुकीत मतदारांनी आपल्या पाठिशी पूर्णपणे राहून मला निवडून दिल्यास डिचोली मतदारसंघातील बेरोजगारी सोडविणे याला माझे प्रथम प्राधान्य राहील, अशी ग्वाही डिचोली (Bicholim) मतदारसंघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार मेघ:श्याम राऊत (Meghshyam Raut) यांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
रुमडामळ पंचायतक्षेत्रात उघड्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याची समस्या

राऊत यांनी सोमवारी कार्यकर्त्यांच्या साक्षीत आपल्या साळ गावातील ग्रामदैवत श्री भूमिका महादेव देवतांचे आशीर्वाद घेऊन आपल्या निवडणूक (Election) प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी काँग्रेसचे (Congress) नेते तथा माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप, काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, प्रदेश काँग्रेस समितीचे नझीर बेग, महिला नेत्या रेखा परब, डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष नितीन (अर्जुन) परब, महिला गटाध्यक्ष मारिया (जेनेट) सौझा, गट अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष बालाखान गोरी, साळमधील ज्येष्ठ नागरिक गोविंद परब, सुरेश परब आदी ग्रामस्थ व राऊत यांच्या मातोश्री, पत्नी आणि कुटुंबिय उपस्थित होते.

यावेळी राज्यात काँग्रेस सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही व्यक्त करीत भाजपच्या (BJP) कारभाराला जनता कंटाळली आहे. काँग्रेसशिवाय अन्य पर्याय नसल्याचे जनतेला कळून चुकले आहे, असे विजय भिके यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
आम आदमी पक्षच गोव्‍याचा सर्वांगीण विकास साधू शकतो: 'आप'चे अभिजीत देसाई

माजी मंत्री राऊत यांची आठवण...

यापूर्वी साळ गावचे सुपूत्र तसेच माजी मंत्री पांडुरंग राऊत यांनी तत्कालीन बलाढ्य नेते स्व. हरिष झांट्ये यांचा पराभव केला होता. हा त्यावेळी साळ गावासाठी इतिहास ठरला होता. माजी मंत्री पांडुरंग राऊत यांनी साळ गावातीलच ग्रामदैवत श्री भूमिका महादेव देवतांचा आशीर्वाद घेतला होता, याची ॲड. रमाकांत खलप यांनी आठवण करून दिली. येत्या निवडणुकीत मेघ:श्याम राऊत यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही खलप यांनी केले.

मेघःश्याम यांचे गाऱ्हाणे...

मेघ:श्याम राऊत यांनी श्री महादेव आणि श्री भूमिका या देवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. राऊत यांना निवडणुकीत पुन्हा यश प्राप्त होवो, असे श्रींच्या चरणी राऊत यांनी गाऱ्हाणे घातले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com