शेतकरी स्वयंपूर्ण झाल्यास...: नरेंद्रसिंग तोमर

देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कृषी क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी सांगितले.
शेतकरी स्वयंपूर्ण झाल्यास...: नरेंद्रसिंग तोमर

Union Minister Narendra Singh Tomar

Dainik Gomantak 

केपे: परदेशातून आयात होणाऱ्या खाद्यावर अवलंबून न राहिल्यास आमच्या देशाला आत्मनिर्भर होण्यास कोणीच रोखू शकत नाही असे पंतप्रधान मोदी म्हणतात व यासाठी देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कृषी क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी सांगितले. ते केपे येथे आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. या मेळाव्याला शेतकऱ्यांची बरीच मोठी उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant), उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, खासदार विनय तेंडुलकर, केपेच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विल्यम फेर्नांडिस व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा सरकारने (Goa Government) स्वयंपूर्ण योजना उत्तमरीत्या राबवली असून ती फक्त गोव्यापुरती सीमित न राहता स्वयंपूर्ण भारत होण्यास याचा लाभ देशाला मिळेल असे तोमर यांनी सांगितले. गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटन व खाणीवर अवलंबून आहे पण कोविड काळात पर्यटन उद्योगावर गदा आली ते पाहता कृषी क्षेत्रात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी कामाला सुरुवात केली होती ते काम प्रमोद सावंत यांनी योग्य प्रकारे पुढे नेऊन अर्थव्यवस्थतेत बळकटी आणण्याचे काम उत्तमरीत्या केले असे तोमर यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे यासाठी प्रयत्नशील असून केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांसाठी अनेक योजना मार्गी लावल्या आहेत असे त्यांनी सांगितले. फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही तर देशातील छोट्या शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेती करावी यासाठी मोदी यांनी देशात दहा हजार शेतकरी उत्पादक संघ सुरू करण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे असे तोमर यांनी सांगितले.

राज्यातील युवक शेतीकडे वळू लागले आहेत ही आनंदाची गोष्ट असून राज्य स्वयंपूर्ण होत चालले आहे असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. राज्यात फक्त भात शेती, ऊस काजू यापूर्ती मर्यादित न राहता मत्स्योत्पादन व पशुपालन या उद्योगांची शेतीला जोड दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले. नवीन तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास याचा जास्त फायदा मिळू शकतो त्यासाठी सर्वसमावेशक शेतीवर भर देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजना पोहचविण्यासाठी स्वयंपूर्ण मित्राद्वारे हे काम सरकारतर्फे केले गेले आहे असे त्यांनी सांगितले.

गोवा हे कृषिप्रधान राज्य बनावे यासाठी मी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकावर आमच्या सरकारने चांगली आधारभूत किंमत शेतकऱ्यांना दिली असून उपकरणे घेण्यासाठी दिले जाणारे अनुदान सरकारकडून पूर्वीच दिले जात असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे असे कवळेकर यांनी सांगितले. राज्य सरकारच्या योजनाबरोबर केंद्र सरकारच्या योजना सुद्धा वेळेवर शेतकऱ्यांना मिळवून देण्यास आमचे कृषी खाते अग्रेसर आहे असे कवळेकर यांनी सांगितले.

यावेळी उत्कृष्ट शेती करणाऱ्या 8 शेतकऱ्यांचा तोमर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच काही शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते कृषी कार्ड ही देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com