Goa Container ship service: 15 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

उद्योगांवर संक्रांत : कंटेनर जहाज सेवा बंद; निर्यातधिष्ठित उद्योग अडचणीत
Goa Mpt Container
Goa Mpt Container Dainik Gomantak

पणजी: गोव्यातील (Goa) मुरगाव (Mormugao) बंदरातून जाणारी कंटेनर जहाज सेवा बंद (Container ship service closed) झाल्यामुळे येथील निर्यातधिष्ठीत उद्योगांवर संक्रांत ओढवली असून निर्यात उद्योगांशी संबंधित 15 हजार लोकांवर बेरोजगारीची (Unemployment) कुऱ्हाड कोसळू शकते. गोवा सरकारसह नूतन केंद्रीय बंदर विकासमंत्री श्रीपाद नाईक यांनी धडाडीने हा प्रश्‍न हाताळला नसल्याने उद्योग क्षेत्रामध्ये नाराजीची भूमिका आहे. (If Goa container ship service is shutdown 15000 workers will be unemployed)

“गोवा सरकारने अद्याप या प्रश्‍नावर गांभिर्याने विचार केलेला नाही, शिवाय केंद्रीय बंदर विकासमंत्री श्रीपाद नाईक यांनी हा प्रश्‍न अग्रक्रमाने हाताळावा म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली. शिपींग मंत्रालयाने अद्याप त्याबाबत कसलाही प्रतिसाद दाखविलेला नाही,’’ अशी माहिती गोवा कस्टम वेंडर संघटनेचे माजी अध्यक्ष अमित कामत यांनी आज दै. ‘गोमन्तक’ला दिली.

गेल्या बुधवारी गोव्यातून शेवटचे कंटेनर जहाज निघाले तेव्हा बऱ्याच कस्टम एजंटच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू जमा झाले होते. गेले दोन दिवस येथील उद्योग क्षेत्रात हीच एक महत्त्वाची चर्चा चालू असून गोवा उद्योग संघटनाही त्याबाबत उद्विग्न बनली आहे. गोव्यातून चालणारी कंटेनर फिडर सेवा कोलंबोहून यायची. दुर्दैवाने या बंदरात माल हाताळण्यासाठी त्यांचे 60 तास खर्च व्हायचे, तर मुंबईत मालाची चढ-उतार केवळ चोवीस तासांत होऊ शकते. वेगवान कंटेनर चढ-उतारासाठी मुरगाव पोर्ट ट्रस्टने जादा क्रेन खरेदी करण्याची व नव्या पायाभूत सुविधा उभारायची आवश्‍यकता असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याची तक्रार याआधीच गोवा उद्योग संघटनेने राज्य सरकार आणि श्रीपाद नाईक यांच्याकडे नोंदविली आहे. मुरगाव बंदरात योग्य सुविधा उपलब्ध केल्या जात नसल्याची या कंटेनर सेवेची बऱ्याच काळाची तक्रार होती.

Goa Mpt Container
Goa: मांद्रे ऑफ कॉलेजला एका टप्प्यात अनुदान देणार; मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

आता मुंबईहून निर्यात

दुर्दैवाने कंटेनर सेवा बंद पडल्याने सुलभ जहाज वाहतुकीकडे नजर ठेवून राज्यात आलेल्या उद्योगांवर अधिकच संकट कोसळले आहे. या उद्योगांना आता मुंबईहून निर्यात करावी लागणार असून त्यात नव्या कटकटींसह खर्चही वाढणार आहे. गोव्यातील मारपोल, युरोलाईन, एसईटी, सीएमएम, नेस्ले, आयएफबी आदी कंपन्या आपल्या उत्पादनाची निर्यात करतात. शिवाय कुंकळ्ळी येथील मत्स्य उत्पादनेही मुरगाव बंदरातून कंटेनरद्वारे निर्यात केली जात असत.

  • गोव्यातून बुधवारपासून बंद झालेल्या कंटेनर सेवेमुळे अनेक उद्योग अडचणीत, निर्यातीवर परिणाम

  • केंद्रीय बंदर विकासमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे तक्रार नोंदवूनही तत्काळ मदत मिळत नसल्याबद्दल उद्योजकांमध्ये अस्वस्थता

  • गोवा उद्योग संघटनेच्या निवेदनानंतर बंदर विकासमंत्री श्रीपाद नाईक यांनी जहाज उद्योग सचिवांना कळवूनही दखल नाही

  • गोव्यातील उद्योग अडचणीत आल्यानंतरही राज्य सरकारकडून दखल नाही

  • मुरगाव बंदराची स्थानिक उद्योगांबाबतची बेफिकीरी कारणीभूत, बंदर व्यवस्थापनाला अधिक महसूल देणाऱ्या कोळसा आणि खनिज मालातच रस

  • शिपिंग उद्योगातील कर्मचारी, कस्टम, क्रेन लिफ्ट गोदामांचे व्यवस्थापक व वाहतूकदार अशा हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

"गोव्यात करसवलत आणि बंदरातील सुलभता असल्यानेच अनेक उद्योग राज्यात आले. परंतु त्या सर्वांची स्थिती सध्या बिकट बनली आहे."

- अमित कामत, कस्टम हॉकर्स संघटना

Goa Mpt Container
Goa: मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ

केंद्रीय बंदर विकासमंत्री श्रीपाद नाईक यांनी आम्हाला कोलंबो-गोवा दरम्यान चालणारी फिडर कंटेनर सेवा बंद होणार नाही असे आश्‍वासन दिले होते. मुरगाव बंदराला जादा क्रेन खरेदीसाठी साहाय्य देण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले होते. दुर्दैवाने तेथे पायाभूत सुविधांमध्ये वाढ झालीच नाही.

दामोदर कोचकर, अध्यक्ष, गोवा उद्योग संघटनात्याकडे मुरगाव बंदर व्यवस्थापनाने संपूर्णपणे दुर्लक्ष केले होते. अमित कामत यांच्या मते बंदर व्यवस्थापनाला केवळ अजस्त्र मालाच्या उलाढालीमध्येच रस आहे. कोळसा, खनिज, पेट्रोलियम पदार्थ यातच त्यांना अधिक नफा दिसतो. कारण ‘वारसेज’ - जो शुल्क खनिजे, कोळसा आदी मालाच्या किमतीवर आकारला जातो, त्याचा मुरगाव बंदर व्यवस्थापनाला जास्त लाभ होतो, तर कंटेनर जहाज सेवेत केवळ कंटेनरांच्या संख्येवरून बंदराला महसूल प्राप्त होतो. त्यामुळे बंदराने हल्ली केवळ कोळसा व खनिज वगळता इतर मालाच्या वाहतुकीबाबत अनास्थाच दाखविली आहे.

दुर्दैवाने कंटेनर सेवा बंद पडल्याने सुलभ जहाज वाहतुकीकडे नजर ठेवून राज्यात आलेल्या उद्योगांवर अधिकच संकट कोसळले आहे. या उद्योगांना आता मुंबईहून निर्यात करावी लागणार असून त्यात नव्या कटकटींसह त्यांचा खर्चही वाढणार आहे. गोव्यातील मारपोल, युरोलाईन, एसईटी, सीएमएम, नेस्ले, आयएफबी आदी कंपन्या आपल्या उत्पादनाची निर्यात करतात. शिवाय कुंकळ्ळी येथील मत्स्य उत्पादनेही मुरगाव बंदरातून कंटेनरद्वारे निर्यात केली जात असत. स्क्रॅप मालाचीही निर्यात मुरगाव बंदरातून केली जात असे.

गोव्यात कस्टम वेंडर्सची संख्या साधारण 20 असून त्यांना आपली कार्यालये बंद करण्याजोगी परिस्थिती ओढवली आहे, अशी माहिती कस्टम एजंट कौस्तुभ कामत यांनी दिली. त्यांच्या मते कंटेनर सेवेमध्ये सुमारे पंधरा हजार कर्मचारी गुंतले आहेत. त्यात वाहतुकीसाठी लागणारी क्रेन आणि इतर कर्मचारी यांचा समावेश होतो.

Goa Mpt Container
Goa : माल खरेदी करा आता ‘व्‍हॉट्‍स ॲप’द्वारे

कंटेनर सेवा 1992 पासून सुरू झाली. त्यावेळी गोव्यात उद्योगांसाठी खास करसवलत लागू होती. या दोन्हींचा लाभ घेण्यासाठी अनेक उद्योग गोव्यात सुरू करण्यात आले. गोव्यातून दर आठवड्याला किमान तीनशे कंटेनर पाठविले जातात. गोव्यात औषध उत्पादक कंपन्यांचीही संख्या मोठी आहे, परंतु राज्यात दहा दिवसांआड येणाऱ्या कंटेनर जहाज सेवेचा लाभ घेणे परवडत नसल्याने ते आपली औषध उत्पादने मुंबईहून निर्यात करतात. गोव्यातून कंटेनर सेवा नियमीत झाल्यास आपला माल ते राज्यातून सुलभपणे पाठवू शकतील, असे मत त्यांनी यापूर्वी अनेकदा मुरगाव बंदर व्यवस्थापनाकडे व्यक्त केले आहे.

-राजू नायक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com