... तर टॅक्सीचालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल: वाहतूकमंत्री

दैनिक गोमंतक
बुधवार, 9 जून 2021

डिजिटल मीटरवरून सरकारला शेवटची संधी

पणजी:  राज्यातील टॅक्सीमालकांना (Taxi Oweners) डिजिटल मीटर्स (Digital Meters) बसविण्यापासून पर्याय नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर (Goa Bench of Mumbai Highcourt) अवमान याचिका प्रलंबित आहे. तीनवेळा खंडपीठाने मीटर्ससाठी मुदतवाढ दिली असून आणखी ती मिळण्याची शक्यता नाही. जर डिजिटल मीटर्स टॅक्सीमालकांनी बसविले नाही तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत माविन गुदिन्हो यांनी दिली. (If taxi owners do not install digital meters, legal action will be taken against them indicated Mavin Gudinho)

नवीन मोटार नियम लवकरच लागू
नवीन मोटार कायद्यातील नियम राज्यात लागू करण्यासंदर्भातची फाईल हातावेगळी केली आहे. कायद्यात विविध नियम उल्लंघनासाठी नमूद करण्यात आलेली दंडाची रक्कम कमीत कमी लागू करण्याची शिफारस केली आहे. ही फाईल सध्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविली आहे. सरकारने बराच काळ निर्णय लागू करण्याबाबत वेळ घेतल्याने केंद्राच्या कारवाईला सामोरे जावे लागेल त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

Goa: बावीस कोटींच्या IVERMECTIN प्रकरणात औषध खरेदी समिती बरखास्त

डिजिटल मीटरवरून सरकारला शेवटची संधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने डिजिटल मीटर्स राज्यातील टॅक्सींना बसविण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती मात्र ती उलटून गेली तरी त्याची कार्यवाही न झाल्याने खंडपीठात अवमान याचिका सादर झाली आहे. या याचिकेत सरकारला शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सरकार त्यासंदर्भात काहीच करू शकत नाही. टॅक्सीचालकांना सुरुवातीला डिजिटल मीटर्ससाठी खर्च करावे लागत असले तरी त्याची रक्कम दोन टप्प्यांत परत केली जाणार आहे. टॅक्सी भाडेदर वाढवून देण्यास केलेल्या मागणीवर राज्य वाहतूक प्राधिकरणाने भाडेदर वाढीबाबत शिफारशी केल्या आहेत. इतर राज्यांनाही टॅक्सी भाडेदरामध्ये वाढ केली असल्याने सरकारचे मतही सकारात्मक आहे. टॅक्सीचालक हे पर्यटकांचे सेवेकरी नसून ते राजदूत आहेत, असे गुदिन्हो म्हणाले. 

कायद्यानुसार सर्व टॅक्सीमालकांना डिजिटल मीटर्स बसविणे बंधनकारक आहे. सध्याचे जग हे स्पर्धात्मक व डिजिटल होत आहे. या सरकारने राज्याबाहेरील ॲप आधारित टॅक्सीसेवेला परवानगी दिलेली नाही व दिलीही जाणार नाही. सध्या ‘अपना भाडा’ ॲप सेवेला परवानगी दिलेली नाही.

संबंधित बातम्या