रिक्त जागा भरा आणि ​सेवेत रुजू करा; कामगारांची मागणी!

आठ दिवसांची दिली मुदत : पेडणे पालिका कामगारांचे लक्षवेधी आंदोलन
रिक्त जागा भरा आणि ​सेवेत रुजू करा; कामगारांची मागणी!
WorkersDainik Gomantak

मोरजी : पेडणे पालिकेचे अनेक कर्मचारी निवृत्त झाले. त्यांच्या रिक्त जागा अद्याप नियुक्ती झालेली नाही. मात्र, दहा ते पंधरा वर्षे हंगामी स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना त्या जागी कायम करावे. तसेच भविष्य निधी वेळेवर भरावा, या मागणीसाठी पेडणे पालिकेच्या 15 हंगामी कामगारांनी (Workers) 22 रोजी लक्ष्‍यवेधी आंदोलन सुरू केले.

कामगारांनी लक्षवेधी आंदोलन केल्‍यामुळे सोमवारी सकाळी पालिका क्षेत्रातील कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी कामगारांकडे चर्चा करून संप मागे घेण्याची विनंती केली. भविष्य निर्वाह निधीविषयी आपण आठ दिवसांत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. सकाळी 10.30 वा.नंतर कामगारांनी पुकारलेला काही काळ संप मागे घेतला.

Workers
छप्‍पर नाही, केवळ भिंतींचा आडोसा!

मात्र, आठ दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही, तर पुन्‍हा आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला. दरम्‍यान, नगराध्यक्ष उषा नागवेकर व नगरसेवक सिद्धेश पेडणेकर यांनी कामगारांकडे चर्चा करून तुमच्या मागण्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. कामगारांनी त्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्‍थगीत ठेवले.

काय आहेत मागण्‍या?

पेडणे पालिकेचे 15 हंगामी कामगार मागच्या 12 ते 15 वर्षांपासून 12 ते 15 हजार रुपयांच्‍या मानधनावर काम करतात. तसेच कामगारांचा भविष्य निर्वाह निधी किती कापला जातो, त्याची माहितीही कामगारांना दिली जात नाही. तो निधी वेळेवर भरला जात नाही. तो वेळेवर भरावा. तसेच हंगामी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्या कामगारांच्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com