गोव्यातील त्या दहा आमदारांना अपात्र न ठरवल्यास चोडणकर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार ?

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन झाला नाही, अशी दर्शवणारी आणखीन कागदपत्रे सादर करण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मागितलेली मुभा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी आज फेटाळली.

पणजी : काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन झाला नाही, अशी दर्शवणारी आणखीन कागदपत्रे सादर करण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मागितलेली मुभा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी आज फेटाळली. काँग्रेस मधून आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांविरोधात चोडणकर यांनी सभापतींसमोर अपात्रता याचिका सादर केली आहे. या याचिकेवर 26 फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी झाली होती. 
त्या सुनावणीवेळी याचिकादारांच्या लक्षात आले होते की दहा आमदारांकडून काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर करण्यात आलेली आहेत.

"नगरपालिका निवडणुकांचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे भाऊसाहेबांना आदरांजली" - दिगंबर कामत 

त्या कागदपत्रांना उत्तर देणारी कागदपत्रे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना  सादर करावयाची होती त्यामुळे त्यांनी तशी मागणी सभापतींकडे लेखी अर्ज देऊन केली होती. त्यांची ही मागणी नामंजूर केल्यामुळे आता समोर असलेल्या कागदपत्रांच्या आधारे सभापती निवड देतील हे पुरेसे स्पष्ट झालेले आहे. सभापतींनी या दहा आमदारांना अपात्र न ठरवल्यास चोडणकर  यांना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असे दिसते. नीळकंठ हळर्णकर, आतानासीओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, आंतोनिओ फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रोड्रिग्ज, क्लाफासियो डायस, विल्फ्रेड डिसा, चंद्रकांत कवळेकर या आमदारांविरोधातील ही याचिका आहे.

पाच पालिकांच्या प्रभाग आरक्षणासंदर्भात गोवा सराकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

संबंधित बातम्या