..तर कोळसा बंद झाला असता

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

वास्को नगरपालिकेत २००० मध्ये नगरसेवक असताना मुरगाव पोर्ट ट्रस्टद्वारे होणाऱ्या कोळसा हाताळणीविरुद्ध आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल तत्कालीन मामलेदारांनी घेतली होती. सरकारच्या वरिष्ठ पातळीवर जर आपण केलेल्या आंदोलनाची दखल घेतली असती, तर आता ती हाताळणी बंद झाली असती.

पणजी :  वास्को नगरपालिकेत २००० मध्ये नगरसेवक असताना मुरगाव पोर्ट ट्रस्टद्वारे होणाऱ्या कोळसा हाताळणीविरुद्ध आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल तत्कालीन मामलेदारांनी घेतली होती. सरकारच्या वरिष्ठ पातळीवर जर आपण केलेल्या आंदोलनाची दखल घेतली असती, तर आता ती हाताळणी बंद झाली असती, असे सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी सांगितले.

केरकर या म्हणाल्या की, नगरसेवक असताना एमपीटीतील कोळसा हाताळविरुद्ध आपण उपोषण केले होते. सुनील मसूरकर यांनी त्याची दखल घेतली होती. त्याशिवाय तत्कालीन पोलिस निरीक्षक एडविन कुलासो यांनीही तक्रार नोंदवून घेतली होती. आंदोलन मागे घ्यावे म्हणून आपणास एमपीटीने आश्‍वासने दिली होती. ती आश्‍वासने एमपीटीने पूर्ण केली नाहीत. आंदोलनाच्यावेळी एमपीटीच्या ५०० कामगारांनी आपणास पाठिंबा दिला होता, आता या कामगारांना घरचा रस्ता दाखविला आहे. एमपीटीने हळहळून वास्कोतील कामगार घेणे बंद केले आणि बाहेरील कामगारांना येथे कामाची संधी दिली. केरकर यांनी यावेळी स्थानिक आमदारांवरही टीका केली.
 

संबंधित बातम्या