आल्मेदा यांच्या विरोधात बोलल्यास...:दीपक नाईक

वास्कोतून येणारी विधानसभा (Assembly) निवडणूक लढवण्यासाठी भाजपने (BJP) उमेद्वारी दावा करणार असल्याची माहिती शेवटी वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक यांनी दिली.
आल्मेदा यांच्या विरोधात बोलल्यास...:दीपक नाईक
दीपक नाईकDainik Gomantak

दाबोळी: पुढील वर्षी होणाऱ्या गोव्यातील विधानसभा निवडणुकीत (Election) राज्य भारतीय जनता पक्षाने आमदार आल्मेदा यांना वास्को उमेदवारी नाकारल्यास पक्षाने निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझा विचार करावा अशी मागणी वास्को भाजप गटाध्यक्ष तथा मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक दीपक ज्ञानेश्वर नाईक यांनी केली.

वास्कोत भाजपला दोन विधानसभा निवडणुकीत विजयी मार्गावर नेणार्‍या आमदार आल्मेदा यांना येथून उमेदवारी नाकारण्याविषयी सर्वप्रथम पक्षाने कार्यकर्त्यांना सांगावे. जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा विचार केल्यास वास्को तून पक्ष्यांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाईक यांनी व्यक्त केली.

वास्को बायणा येथील मुरगाव नगरपालिकेचे (Municipality) नगरसेवक तथा वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक (Deepak Naik) यांनी मंगळवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून वरील माहिती दिली. राज्य भाजप पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वास्कोतून नामदार कार्लुस आल्मेदा यांना उमेदवारी नाकारल्यास सर्वप्रथम पक्षाने याविषयी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

दीपक नाईक
प्रसिद्ध कोकणी साहित्यिक 'दिलीप बोरकर' यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री

तसेच वास्कोतून इतर व्यक्तीला वास्कोतून भाजपची उमेदवारी देण्याचा विचार केल्यास सर्वप्रथम त्यांनी वास्को (Vasco) भाजपमंडळ व मुरगाव नगरपालिकेतील भाजप नगरसेवकांना विचारणे गरजेचे ठरणार आहे. वास्कोत भाजपला सलग दोन वेळेला विधानसभा निवडणुकीत विजयी करणारे आमदार आल्मेदा यांना डावलणे एकदम चुकीचे ठरणार आहे. वास्को भाजप मंडळ आमदार अल्मेदा यांच्या मागे आहे.

'एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा जो वास्कोतून उमेदवार आल्मेदा यांच्या विरोधात बोलणार यांना उमेदवारी देण्याचा विचार केल्यास याचे परिणाम वाईट होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.'

गेली वीस वर्षे मी पक्ष्याचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहे. वास्कोतून दोन वेळेला गटाध्यक्ष संभाळून पक्षाचे कार्य सर्वापर्यंत पोहोचवलेले आहे. मुरगाव नगरपालिकेत नगरसेवक (Corporator)म्हणून निवडून येऊन नगराध्यक्षपद भूषवून विविध विकास कामे मार्गी लावलेली आहे. माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मी यशस्वीरित्या विकासकामांना चालना दिलेली आहे.

दीपक नाईक
बुल ट्रॉलिंगला रोखण्यात मत्स्यव्यवसाय विभाग अपयशी: एग्नेलो रॉड्रिग्स

वास्कोतुन गेल्या काही दिवसापासून भाजप पक्षाच्या विरोधात काम करणारा व्यक्ती आपल्याला आपल्यालाच येथून भाजपची उमेदवारी मिळणार असे जाहीर करीत आहे. ज्या व्यक्तीने गेल्या पालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला विरोधात काम केले याला पक्षाने उमेदवारी दिल्यास ही मोठी चूक ठरणार आहे.

वास्कोतुन भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वप्रथम प्राधान्य असणार ते स्थानिक आमदार (MLA) कार्लुस आल्मेदा जर पक्षश्रेष्ठीने इतर दुसऱ्यांचा जो व्यक्ती पक्षात नसताना त्याच्या उमेदवारीसाठी विचार केल्यास आमदार आल्मेदा यांच्यावर एका प्रकारे अन्याय होणार आहे. वास्कोतून भाजप उमेदवारी इतर दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सर्वप्रथम येथील कार्य कर्त्यांना सामावून घ्यायला पाहिजे.

दीपक नाईक
थकलेल्या जीवाला आराम देणारा 'दवरणे';पाहा व्हिडिओ

पक्षातून बाहेर गेलेले आल्मेदा यांचे मित्र व माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत (Nandadeep Raut) यांचा सुद्धा भाजपने वास्कोतून उमेदवारीसाठी विचार केल्यास वास्को भाजप मंडळ विचार करण्यासाठी कदाचित पुढाकार घेणार असल्याची माहिती दीपक नाईक यांनी दिली.

राज्यात भाजपला जर वास्कोतून नवीन चेहरा पाहिजे असले तर मी पक्षाची पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी सक्षम आहे असे नाईक यांनी सांगितले. गेली वीस वर्षे मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून वास्कोतून येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपने उमेद्वारी दावा करणार असल्याची माहिती शेवटी वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक यांनी दिली.

Related Stories

No stories found.