pramod 1.jpg
pramod 1.jpg

गोव्यात जायचं विचार करताय, मग मुख्यमंत्री काय म्हणाले ते वाचा

पणजी : तुम्ही जर गोव्यात (Goa) पर्यटनासाठी (tourism) जायचा विचार करीत असाल तर मग गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) काय म्हणाले ते तुम्हाला माहिती असायला हवं. सध्या गोव्यात संचारबंदी (Curfew  Goa) आहे. ही संचारबंदी 21 जूनपर्यंत असेल. त्यानंतर ती वाढविली जाणार काय, असा प्रश्न सध्या पर्यटनप्रेमींना पडलाय. परंतु, गोव्यात जोपर्यंत लसीचा पहिला डोस पूर्ण होत नाही तोपर्यंत गोवा हे पर्यटनासाठी खुले होणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे पर्यटकांना त्यांनी आपला संदेश कळविला आहे. येत्या 30 जुलैपर्यंत गोव्याच्या प्रत्येक नागरिकाला पहिला डोस देण्याचे लक्ष सध्या सरकारपुढे आहे. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. (If you are thinking of going to Goa then read what the Chief Minister said)

गोव्यात सध्या मॉन्सून (Monsoon) बरतोय. मात्र काही पर्यटक हे खास पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. संचारबंदीमुळे त्यांना गोव्यात प्रवेश मिळत नाही. ते संचाबंदी कधी हटणार याच्या प्रतिक्षेत आहेत. 

कोरोना संख्या दिलासादायक
गोव्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मृत्यूंचा आकडाही खाली आला आहे. गुरुवारी केवळ 6 मृत्यूंची नोंद झाली. हा आकडा गेल्या काही महिन्यांपासूनचा निच्चाकी आकडा मानला जात आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही पाचशेच्या खाली आहे. गुरुवारी 254 नवे रुग्ण आढळून आले. तसेच गोव्याचा रिकव्हरी रेट सध्या 95. 85 एवढा आहे. त्यामुळे गोव्यासाठी ही दिलासदायक बाब ठरत असून गोवा लवकर पर्यटकांसाठी खुला होइल, अशी आशा पर्यटकांना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com