Covid 19: गोव्यात फिरायला जाताय, तर ही बातमी एकदा वाचा...

Covid 19: गोव्यात फिरायला जाताय, तर ही बातमी एकदा वाचा...
goa trip.jpg

पणजी: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा गोवाला (goa) चांगलाच फटका बसला आहे.तेथे महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पर्यटन (Tourism) व्यावसायाला याची झळ बसली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून गोवा आत्ता कुठे सावरत आहे. तरी तेथील निर्बंध (Restrictions) मात्र अद्याप फारसे शिथील करण्यात आलेले नाहीत. पण तरीही इतर राज्यातून गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोव्यात फिरायला जायचे असेल तर, त्या व्यक्तीने लसीचे (vaccines) दोन्ही डोस घेतलेले पाहिजे. तरच त्यांना गोव्यात परवानगी देण्यात येणार आहे. अशी माहिती गोव्याचे उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर (Manohar Ajgaonkar) यांनी दिली आहे. आजगावकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, आपण पर्यटकांना गोव्यात येण्याची मुभा देऊ शकतो, मात्र त्यांनी गोव्यात येताना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे.(If you go for a trip in Goa read this news once) 

उच्च न्यायालयाने (High Court) गोव्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पर्यटकांनी (tourists) गोव्यात प्रवेश करण्याआधी कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. पण आता त्या व्यक्तीने लसीचे दोन डोस घेतलेले असणे देखील गरजेचे आहे. दरम्यान, गोवा सरकारने बुधवारी जाहीर केले की ते 18-44 वयोगटातील लसीकरणासाठी राज्यात 'टीका उत्सव 3.0' आयोजित करणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, “टीका उत्सव 3.0.च्या माध्यमातून आम्ही राज्यात 18-44 वयोगटातील सर्व लोकांना लसी देऊ शकू. यापूर्वी आयोजित केलेल्या टीका उत्सवांना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. राज्य सरकारने यापूर्वी सर्व पंचायत व नगरपरिषदांमध्ये दोन टिका उत्सव आयोजित केले होते .

 'टीका' उत्सवाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी विरोधी पक्ष अनावश्यक टीका करत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्य सरकारने २२ कोटींच्या ‘आइवरमेक्टिन’ गोळ्या खरेदी केल्या आहेत, ज्या आता टाकून द्याव्या लागतील. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता कोविड-19  च्या उपचारासाठी ‘आइवरमेक्टिन’ वापरण्यास स्थगिती दिली आहे. असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com