52वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर रोजी

चित्रपट महोत्सव 'हायब्रिड' पद्धतीने होणार, मनोरंजन संस्था चित्रपटांचे ओपन स्क्रीनिंग करण्याच्या तयारीत
52वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर रोजी
मंत्री प्रकाश जवडेकर 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पोस्टर चे अनावरण करताना Tweeter / @PrakashJavdekar

IFFI 2021: नोव्हेंबर महिन्यात गोव्यात होणाऱ्या 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (52nd IFFI 2021) 6 हजार प्रतिनिधींची नोंदणी होणार आहे. आतापर्यंत 1,300 प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. चित्रपट महोत्सव हायब्रिड पद्धतीने होणार असला तरीही चित्रपटांचे ओपन स्क्रीनिंग करण्याचा मनोरंजन संस्थेचा प्रस्ताव आहे.

मंत्री प्रकाश जवडेकर 52 व्या आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सवाच्या पोस्टर चे अनावरण करताना
'दोन दिवसात प्रश्न सोडवा अन्यथा कुटुंबियांसह रस्त्यावर उतरु'

20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत पणजी येथे आंतरराष्ट्रीय योजित चित्रपट महोत्सव होणार आहे. महोत्सवाची तयारी सुरू झाली असून यासाठी मनोरंजन संस्थेकडून रोषणाई, स्वच्छता मोहीम तसेच इतर कामांच्या निविदा जारी करण्यात आल्या आहेत. उद्घाटन तसेच इतर कार्यक्रमाची माहिती 30 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल, अशी माहिती मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे. महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू आहे. गोव्याच्याबाहेरूनसुद्धा अनेक प्रतिनिधी चित्रपट महोत्सवासाठी येणार आहेत.

मंत्री प्रकाश जवडेकर 52 व्या आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सवाच्या पोस्टर चे अनावरण करताना
'हिंदी भाषेमुळे देशाची एकता आणि एकात्मता अबाधित'

प्रतिनिधींची नोंदणी बुधवारपासून सुरु झाली आहे. या वर्षीच्या चित्रपट महोत्सवात जवळपास 300 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. समुद्रकिनारी तसेच इत ठिकाणीही ओपन स्क्रीनवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव असून करोनाची स्थिती पाहून या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

चित्रपट महोत्सवातील काही कार्यक्रम व्हर्चुअल स्वरूपात तर काही कार्यकरम प्रत्यक्ष होतील. आयोजनाविषयीच्या बैठका लवकरच सुरू होतील. 2020 चा 51वा चित्रपट महोत्सव गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये होण्याऐवजी या वर्षीच्या जानेवारीत झाला होता.

Related Stories

No stories found.