'The Kashmir Files प्रोपगेंडा फिल्म, चित्रपट महोत्सवात समावेश होणं...', IFFI च्या ज्युरींचं मत

The Kashmir Files: 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात मोठ्या उत्साहात पार पडला.
The Kashmir Files
The Kashmir Files Dainik Gomantak

The Kashmir Files: 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात मोठ्या उत्साहात पार पडला. चित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी बिग फिल्म स्टार्स गोव्यात पोहोचले होते. दरम्यान, इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान, या चित्रपटाचे वर्णन इस्त्रायली चित्रपट निर्मात्याने वल्गर म्हणून केले आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाबद्दल बोलताना नदाव लॅपिड म्हणाले की, 'हा चित्रपट प्रोपगेंडा आधारित असून तो वल्गर आहे.' नदाव लॅपिड यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, 'सरकारने (Government) आयोजित केलेल्या या प्रतिष्ठित महोत्सवात 'काश्मीर फाइल्स' या 15 व्या चित्रपटामुळे आम्ही सर्वजण अस्वस्थ झालो आणि आम्हाला धक्का बसला...'

The Kashmir Files
Anupam Kher on The Kashmir Files : 'चित्रपटातील माझे अश्रू आणि वेदना खऱ्या'; अनुपम खेर झाले भावूक

तसेच, या कार्यक्रमात गोव्यचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. विवेक अग्निहोत्री यांच्याद्वारा बनवण्यात आलेल्या या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे.

The Kashmir Files
The Kashmir Files 2: काश्मिरी पंडितांवरील अत्याचार पुन्हा येणार प्रेक्षकांसमोर

दुसरीकडे, जेव्हा नदाव लॅपिड यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा बॉलिवूड स्टार्सनेही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. अशोक पंडित यांनी ट्विट करत म्हटले की, "मी काश्मीर फाइल्ससाठी नदाव लॅपिड यांनी वापरलेल्या भाषेवर टीका करतो. या चित्रपटात l लाखाहूंन अधिक काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाचे चित्रण केले आहे, एक काश्मिरी पंडित म्हणून मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com