IFFI Goa 2022: 53 व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन; सौरांना जीवनगौरव तर चिरंजीवी 'Personality of The Year'

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दिमाखात सुरुवात
53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak
Celebrities' Performances in IFFI 2022
Celebrities' Performances in IFFI 2022 Dainik Gomantak

IFFI च्या उद्घाटन कार्यक्रमात सारा अली खान, वरुण धवन, कार्तिक आर्यन तसेच अमृता खानविलकर सारखे दिग्गज कलाकार नृत्यांचे सादरीकरण करणार आहेत. 

Indian film personality of the year
Indian film personality of the yearDainik Gomantak

मेगास्टार चिरंजीवी यांना ''Indian film personality of the year 2022'' पुरस्कार प्रदान

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचा टिपलेला एक क्षण

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेले दिग्गज कलाकार

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमास सिनेप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

मुख्य परीक्षकांचा केला सन्मान

 राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी उपस्थितांना केले संबोधित

इफ्फीच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करताना गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी सिनेमा म्हणजे भारतीय समाजजीवनाचे प्रतिबिंब असल्याचं म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

इफ्फीचा पडदा उघडला

इफ्फीच्या मुख्य कार्यक्रमाला आरंभ झाला आहे. आरंभी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे दाखवण्यात येणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या संघर्षाची झलक दाखवण्यात आली. याला अभिनेते मनोज वाजपेयी यांचा आवाज देण्यात आला आहे. त्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे बाजपेयी यांनी म्हटले आहे.

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

स्पॅनिश फिल्ममेकर कार्लोस सौरा यांना 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' प्रदान

स्पॅनिश फिल्ममेकर कार्लोस सौरा यांना सत्यजित 'रे जीवनगौरव पुरस्कार' यांना प्रदान. हा पुरस्कार मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सौरा यांनी व्हिडीओद्वारे संदेश देत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर हा पुरस्कार सौरा यांच्या कन्या अॅना सौरा यांनी स्विकारला. 93 वयाचे कार्लोस सौरा यांनी सिनेसृष्टीसाठी आयुष्य वेचल्याबद्दल केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले.

ऑस्ट्रेलियात मला RRR सिनेमा पाहिला आहे का? असं विचारलं जाते तर यामध्येच भारतीय सिनेसृष्टीचे यश लपलेले आहे - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

ऑस्ट्रेलियातील नेते मला RRR सिनेमा पाहिला आहे का? असे विचारत असतील तर यातच भारतीय सिनेसृष्टीचे यश लपलेले आहे. असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

दिग्गज अभिनेत्यांचा केला सत्कार

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

गोव्यात सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कार्यक्रमाच्या आरंभी अभिनेता मनोज वाजपेयी, अजय देवगण, परेश रावल यांचा त्यांच्या सत्कार करण्यात आला.

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

सिनेअभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्या 'श्री गणेश वंदन' सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना केले आमंत्रित

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आरंभी पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, सिनेकलाकार यांना नव्या चित्रपट निर्मीतीसाठी गोव्यात आमंत्रित केले आहे. गोवा सरकार आपल्याला संपुर्ण सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

फ्रान्समधील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने यंदाच्या IFFI मध्ये 'फ्रान्स' हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. याबाबत फ्रान्सचे राजदूत Emmanuel Lenain यांनी माहिती दिली.

Actress Ruchita Bhatt
Actress Ruchita BhattDainik Gomantak

अभिनेत्री ऋषिता भट्टने रेड कार्पेटवर लावली हजेरी

Actor Manoj Bajpai
Actor Manoj BajpaiDainik Gomantak

अभिनेता मनोज वाजपेयी रेड यांनी कार्पेटवर लावली हजेरी

Actress Amruta Khanvilkar
Actress Amruta KhanvilkarDainik Gomantak

इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरली चंद्रमुखी

Actor Ajay Devgn
Actor Ajay DevgnDainik Gomantak

अभिनेते अजय देवगण अन् कार्तिक आर्यन यांची रेड कार्पेटवर झलक 

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रेड कार्पेटवर दाखल

53 IFFI Goa: Opening Ceremony 

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

इफ्फीच्या रेड कार्पेटवर अभिनेते सुनील शेट्टी, वरुण धवन अभिनेत्री सारा अली खान, गीतकार प्रसून जोशी यांची हजेरी

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी चित्रपट महोत्सवात लावली हजेरी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये कलाकारांच्या स्वागतासाठी Red Carpet सज्ज

alma and oskar
alma and oskarDainik Gomantak

ऑस्ट्रियन चित्रपट अल्मा आणि ऑस्करने इफ्फीची सुरुवात

पहिल्या दिवशी डायटर बर्नर दिग्दर्शित ऑस्ट्रियन चित्रपट "अल्मा आणि ऑस्कर" ने सुरूवात झाली. या चित्रपटात व्हिएनीज समाजातील अल्मा आणि ऑस्ट्रियन कलाकार ऑस्कर यांच्या नात्याचे वर्णन केले आहे.

Actor Paresh Rawal
Actor Paresh RawalDainik Gomantak

बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनी रेड कार्पेटवर लावली हजेरी

अभिनेते परेश रावल यांच्या 'स्टोरीटेलर' या चित्रपटाचे इफ्फीमध्ये प्रदर्शन होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते आज रेड कार्पेटवर दाखल झाले आहेत. ''माझ्या चित्रपटाचे पहिल्यांदाच इफ्फीमध्ये प्रदर्शन होणार असल्याने आपल्याला आनंद झाल्याचे'' ही त्यांनी म्हटले आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीला गोव्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमास उपस्थित आहे.

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीला आजपासून गोव्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील पहिल्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. इफ्फी जगातील कलाकारांना आपले आकर्षित करणारे व्यासपीठ बनले असल्याचं ठाकूर यांनी म्हटले आहे.

53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak

जगभरातील सिनेकलाकारांनी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53 व्या आवृत्तीला हजेरी लावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com