इफ्फीने भारतीय सिनेमाला नवी ओळख दिली !

गेल्या 52 वर्षात इफ्फी (Iffi) ने जगभरात भारतीय सिनेमाला (Indian Cinema) स्थान मिळवून दिले.
इफ्फीने भारतीय सिनेमाला नवी ओळख दिली !
IffiDainik Gomantak

गेल्या 52 वर्षात इफ्फी (Iffi) ने जगभरात भारतीय सिनेमाला (Indian Cinema) स्थान मिळवून दिले. देशातील कलाकारांना त्यांचा मान सन्मान आणि ओळख मिळवून दिली. या वर्षी आपण देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहोत. आणि शतायू स्वातंत्र्यदिनाकडे वाटचाल करताना आपण येत्या 25 वर्षांत जगभरात इफ्फीच्या माध्यमातून देशाचा सिनेध्वज उंच फडकवत ठेवूया, असा निश्चय केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आज व्यक्त केला. ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित 25 व्या इफ्फीचे हेमामालिनी यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन झाल्यानंतर ते बोलत होते.

या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई (Sreedharan Pillai), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant), इफ्फी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Union Minister Shripad Naik) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Iffi
गोव्यात आजपासून सिनेमोत्सव,सिनेताऱ्यांची मांदियाळी

भारताची कथा ही भारतीयांनी लिहिलेली आणि परिभाषित केली आहे. त्यामुळे देशातील सिनेनिर्मात्यांनी आपल्या देशातल्या या सहयोगी वैविध्‍यतेला आपल्या सिनेमांच्या माध्यमातून सिनेमॅटिक कॅलिडोस्कोपचा एक भाग बनवावे, असे आवाहनदेखील यावेळी अनुराग ठाकूर यांनी केले. येणाऱ्या काळात भारत हा जगातील सिनेकर्मींसाठी महत्वाचे केंद्र बनावे आणि सिनेमातील निर्मितीपश्चात कामासाठी जगभरातून सिनेकर्मींची पाऊले भारताकडे वळावी, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असेही ठाकूर यांनी नमूद केले.

'गोव्यात व्हावी फिल्मसिटी'

गेल्या 17 वर्षांपासून इफ्फिचे आयोजन करणाऱ्या गोव्याचा लौकिक आज जगभरात पोहोचला आहे. देशविदेशातून याठिकाणी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सिनेकर्मी येतात. मनोरंजनाच्या माध्यमातही आता गोवा स्वंयपूर्ण होत आहे. गोवा मनोरंजन सोसायटीच्या माध्यमातून गोव्यातील चित्रीकरणासाठी आवश्यक त्या सगळ्या परवानग्या एकल खिडकीच्यामाध्यातून देण्यात येतात हे नमूद करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात सिनेमा अधिक रुजण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि राज्यामध्ये सरकारच्यावतीने किंवा जनता आणि सरकारच्या सहकार्यातून ( PPP) अद्ययावत फिल्मसिटी उभारण्यास पुढे यावे अशी मागणी यावेळी आवर्जून केली.

Iffi
इफ्फीच्या उद्घाटन समारंभात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक

म्हणून ओटीटी माध्यमांचा केला इफ्फित समावेश'

महामारीने 'सामान्य' काय आहे याबद्दलची व्याख्या बदलली आहे. संकटात संधी कशी साधायची ते सगळ्यांना शिकवले. याच कोरोना काळात सिनेमा-आणि-ओटीटी हे नवे मिश्रण जगभरात मोठ्या प्रमाणात रुजले. आणि नजीकच्या भविष्यात ते कायम राहण्याची शक्यता आहे. किंबहुना ही परिस्थिती फायदेशीर असल्याचे सांगत महामारीच्या काळात ओटीटी तंत्रज्ञानाशिवाय, चित्रपट उद्योगातील सर्जनशील प्रतिभा दडपली गेली असती आणि चित्रपट उद्योगाची बाजारपेठ ठप्प झाली असती. पण ओटीटीने या सगळ्यांना मदतीचा हात दिला, म्हणूनच यावर्षीच्या इफ्फिमध्ये त्यांचा समावेश केल्याचे यावेळी अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान

या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व 2021, हा पुरस्कार अनुराग ठाकूर, प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या हस्ते प्रदान केला. तर प्रसिद्ध गीतकार आणि सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी हे या पुरस्काराचे दुसरे मानकरी असून त्यांना इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com