‘इफ्फी’त घोटाळा झाल्याचे माहिती नाही; फळदेसाई
पणजी: इफ्फीत घोटाळा झाल्याचे मला माहीत नाही. कारण माझ्या कार्यकाळात कामकाज पारदर्शकपद्धतीने झाले आहे. 2018-21 दरम्यान ईएसजी उपाध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ होता. परंतु, त्या अगोदर आठ वर्ष ऑडिट झाले नव्हते. ते ऑडिट एका वर्षात पूर्ण करून सगळे सुरळीत केले.
(Iffi is not known to have been scammed faldesai)
परंतु त्यात संशयास्पद असे काही सापडले नाही, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले. पर्वरी येथील सचिवालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ऑडिट न झाल्याने आम्हला त्रास होत होता. त्यासाठी कमी वेळेत ते पूर्ण करून घेतले. परंतु, आज मी ईएसजीमध्ये नाही. त्यासाठी तेथे काय घडत आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.
‘इफ्फी घोटाळा’प्रकरणी ‘एफआयआर’ नोंदवा
2014 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) घोटाळाप्रकरणी ‘एफआयआर’ नोंद करून दर महिन्याला तपासकामाचा अहवाल सादर करा. या प्रकरणातील गायब झालेल्या दस्तावेजप्रकरणी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश प्रथमश्रेणी न्यायालयाने देत तपासकामाबाबत ताशेरे ओढले आहेत. दस्तावेज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नष्ट करण्यात आल्याने न्यायालयाने त्याची दखल घेतली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना तक्रार दुर्गादास कामत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 2014 साली इफ्फी आयोजनात कामाच्या निविदांमध्ये, विमानांच्या तिकिटांसाठीच्या एजन्सीकडे केलेल्या व्यवहारात, बॅग्सचा पुरवठा यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे आरोप ‘कॅग’ने अहवालात काढलेल्या निष्कर्षावरील आधारीत त्यांनी पणजी पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीत केले होते. या तक्रारीची एक प्रत पोलिस अधीक्षकांनाही दिली होती.
या तक्रारीवर पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांनी पणजी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक व सरव्यवस्थापक श्रीपाद नाईक यांचा समावेश केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.