कारागृहातील व्हिडिओ चित्रिकरणाची तुरुंग महानिरीक्षकांकडून चौकशी सुरू 

विलास महाडिक
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020


कोलवाळ कारागृहात ३० सेकंद व २० सेकंदाचे दोन वेगवेगळे व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात आले आहेत व गुन्हेगार अन्वर शेख हा जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले होते.

पणजी

कोलवाळ कारागृहात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या कैद्यांच्या गटाकडून इतर कैद्यांना धमकावण्याचे प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरला झाला होता त्याची दखल घेऊन तुरुंग महानिरीक्षकांकडून चौकशी सुरू झाली आहे. या कारागृहात मोबाईलने चित्रीकरण करण्यात आले असल्याने तेथील ड्युटीवरील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 
या व्हिडिओमध्ये कैदी अन्वर शेख अका टायगर हा इतर काही कैद्यांना घेऊन कारागृहात एखाद्या फिल्मी स्टाईलने दबंगगिरी करताना दिसत आहेत. या कैद्यांचा गट एका नायजेरियनला धमकावत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ जरी काही महिन्यापूर्वीचा असून त्यातील काहीजण जामिनावर बाहेर आहेत. मात्र ज्या प्रकारे हा व्हिडिओ कारागृहात चित्रीकरण करण्यात आला आहे त्यावरून कारागृहातील सुरक्षाप्रश्‍न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू करून या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कैद्यांचा गट तसेच इतर कैद्यांची जबानी नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. जे कैदी जामिनावर आहेत त्यांच्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार कोलवाळ कारागृहात ३० सेकंद व २० सेकंदाचे दोन वेगवेगळे व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात आले आहेत व गुन्हेगार अन्वर शेख हा जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये मराठी गाणे आहे. हा व्हिडिओ कारागृहातीलच एका कैद्याने मोबाईलवर हे चित्रीकरण केले होते. संशयित शेख याला बलात्काराच्या प्रकरणात अटक झाली होती व त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली होती. 

 

 

संबंधित बातम्या