उसगावातील पीडीए मार्केट प्रकल्पाकडे दुर्लक्ष

वार्ताहर
रविवार, 13 सप्टेंबर 2020

तिस्क उसगाव येथील पीडीए मार्केट प्रकल्प इमारतीच्या दुरुस्तीकडे शासनाने दुर्लक्ष केले असून त्यामुळे इमारतीला धोका वाढला आहे.

फोंडा:  तिस्क उसगाव येथील पीडीए मार्केट प्रकल्प इमारतीच्या दुरुस्तीकडे शासनाने दुर्लक्ष केले असून त्यामुळे इमारतीला धोका वाढला आहे.

तिस्क उसगाव येथील पीडीए मार्केट प्रकल्पाची इमारत फार जुनी झाली असून त्यामुळे तिची त्वरीत दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेली दुकाने खरेदी करून व्यावसायिक आपला व्यवसाय करतात. दुकानदारांच्या वरचे स्लॅब कमकुवत झाले असून स्लॅबचे वरील सिमेंट कप्पे खाली गळून पडत आहेत. लोखंडी सळ्या गंजलेल्या अवस्थेत आहेत. 

कित्येकवेळा दुकानासमोरवरील स्लॅबचे बीमखाली पडण्याचे प्रकार घडलेले आहे. सध्या पीडीए मार्केट प्रकल्पाच्या इमारतीला धोका अधिक वाढला असून त्यामुळे ती जर्जर स्थितीत आहे. पीडीए मार्केट प्रकल्प इमारत कधी कोसळेल याची शाश्‍वती देता येत नसून  दुकानदार व कामगार जीव मुठीत ठेवून काम करावे लागत आहे. तसेच पीडीए मार्केट प्रकल्प इमारतीच्या खाली बसून आपल्या मालाची विक्री करताना दिसून येत आहे. सध्या पीडीए मार्केट प्रकल्पाच्या परिसरात बसणाऱ्या विक्रेत्यांकडून सोपो कर आकारला जात नसून त्यामुळे विक्रेत्यांना आयतेच फावते. गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन सोपो करामुळे संबंधित खात्याचा महसुल बुडाल्यात जमा झाला आहे. तिस्क उसगाव येथील जुन्या पीडीए प्रकल्पाच्या जागी नवीन सुसज्ज बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव होता.

 परंतु सरकारने  तयार केलेल्या नवीन आराखडा कागदोपत्री राहिला आहे. संबंधित खात्याचे अधिकारी पीडीए मार्केट प्रकल्पाच्या जागेकडे वारंवार भेट देऊन जात असून त्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरवली जात आहे. सरकाराकडून दुकानदारांना वारंवार आश्‍वासन दिली जातात. परंतु ती पाळली जात नाहीत. सरकारने तसेच संबंधित खात्याने याकडे लक्ष घालून पीडीए मार्केट प्रकल्पाची इमारत सध्या डागडुजी करून दुरुस्ती करण्याची मागणी दुकानदारांकडून होत आहे. goa

संबंधित बातम्या