पर्यटन क्षेत्रात बेकायदेशीर व्यवसाय खपवून घेणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

13 पर्यटन सेवेच्या उपक्रमाचे उद्‌घाटन
CM pramod sawant
CM pramod sawantdainik gomantak

पणजी: राज्याला देशाची पर्यटन राजधानी बनविण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, यासाठी राज्यात पर्यटन क्षेत्रात कसल्याच प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत अशी तंबी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली आहे.

पर्यटन खात्याच्यावतीने 13 पर्यटन सेवेच्या ऑनलाईन उपक्रमाचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, मुख्य सचिव पुनित गोयल, पर्यटन सचिव रवी धवन उपस्थित होते. या कार्यक्रमाला टीटीआयचे अध्यक्ष नीलेश शहा, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि सीआयआयचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

CM pramod sawant
बेरोजगारीत गोवा पाचव्या क्रमांकावर!

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, की गोव्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनविण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी हातभार लावावा. कोविडनंतर गोवा उत्तम पर्यटन स्थळ असल्याचे सिद्ध झाले आहे. पर्यटनासाठी लागणाऱ्या सुविधा निर्माण करणे आणि त्या चांगल्यारीतीने सांभाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. गोवा ‘ग्रीन आणि क्लीन’ आहे म्हणूनच पर्यटक गोव्याला पसंती देतात. त्यामुळे तसा गोवा ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

यावेळी मंत्री खंवटे म्हणाले, की पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधनसुविधा उभारल्या जातील. राज्यात काही ठिकाणी बेकायदेशीर वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरू असल्याचे लक्षात आले आहे. मात्र, वॉटर स्पोर्टसाठी बंदर कप्तान खाते आणि पर्यटन खाते या दोन्ही खात्यांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे. यासाठी येथे आठवड्याभरात बैठक बोलावून चर्चा करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com