मांडवी नदीतील वॉटरमार्क या तरंगत्या रेस्टॉरंटला बेकायदेशीर वीज जोडणी?

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

मांडवी नदीत असलेल्या  वॉटरमार्क या तरंगत्या  रेस्टॉरंटला  बेकायदेशीर वीज जोडणी दिल्याचा आरोप गोवा राज्य  राष्ट्रवादी काँग्रेसचे  सरचिटणीस संजय बर्डे यांनी केला आहे.

पणजी: मांडवी नदीत असलेल्या वॉटरमार्क या तरंगत्या  रेस्टॉरंटला  बेकायदेशीर वीज जोडणी दिल्याचा आरोप गोवा राज्य  राष्ट्रवादी काँग्रेसचे  सरचिटणीस संजय बर्डे यांनी केला आहे. याबाबत आपण पोलिसात  तक्रार नोंदवल्याची  माहिती बर्डे यांनी आज 20 रोजी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संजू  तिवरेकर व सिध्देश मोरे उपस्थित होते.

पणजी रेसिडेन्सी च्या समोर मांडवी नदीच्या पात्रात  वाटरमार्क नावाचे तरंगते रेस्टॉरंट आहे. तरंगत्या जेटीच्या सहाय्याने या रेस्टॉरंटवर  ये जा करण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र अशा तरंगत्या बोटीना कायद्याने वीज जोडणी देता येत नसल्याचा दावा संजय बर्डे यांनी यावेळी केला व ही वीज जोडणी  बेकायदेशीरपणे  देण्यात आल्याचा आरोप करुन सदर वीज जोडणी त्वरीत तोडावी व सदर रेस्टॉरंट चालकावर कारवाई करुन दंड वसूल करावा. अशी मागणी यावेळी बर्डे यांनी केली. अशा रेस्टॉरंटमध्ये जनरेटर वापरणे गरजेचे आहे. मात्र दोन मंत्र्यांचे सहकार्य घेऊन सरकारच्या पाठिंब्यावर या रेस्टॉरंटला वीज मीटर बसवण्यात आला आहे व बेकायदेशीर वीज जोडणी देण्यात आल्याचा दावा बर्डे यांनी केला.  हा एक प्रकारचा भ्रष्टाचार असल्याचे सांगून आपण या प्रकाराविरुध्द पणजी पोलिसात तक्रार नोंद केल्याची माहिती बर्डे यांनी दिली. तसेच आजच आपण दक्षता खात्याकडे  तक्रार दाखल करणार असल्याचे संजय बर्डे यांनी सांगितले.

पणजी शहरातील रस्ते फोडण्यास आणि खोदण्यास पूर्णपणे बंदी -

पणजी   म्हापसा महामार्गाच्या बाजूला असलेल्या खांबावर केसीनो व इतर काही कंपण्यांच्या जाहिरातीचे   फलक लावण्यात आले आहेत. ते सर्व जाहिरात फलक बेकायदेशीर लावण्यात आले असून वर्षाला सुमारे  4 कोटी 80 लाख रुपयांचा सरकारी महसूल त्यामुळे बुडत असल्याचा दावा संजय बर्डे यांनी यावेळी  केला व सबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या