Vasco Murmugao: थकबाकी भरा, स्वच्छता राखा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स

वास्को येथील कारवाईत विक्रेत्यांच्या खुर्च्या, टेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
Vasco Murmugao
Vasco MurmugaoDainik Gomantak

वास्को रेल्वे स्थानकासमोर हातगाड्यांवर निरनिराळे खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या तसेच, पदपथावर केलेले अतिक्रमण व परिसरातील गलिच्छपणा याची दखल वास्को मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी घेतली. लिओ रॉड्रिग्स यांच्या नेतृत्वाखाली वास्को रेल्वे स्थानकाबाहेरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर आज (दि.10) अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत विक्रेत्यांच्या खुर्च्या, टेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. 50 हजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या एका विक्रेत्यांची हातगाडीही यावेळी जप्त करण्यात आली.

Vasco Murmugao
Sal River: साळ नदी प्रदूषण! मंत्री काब्राल यांच्याविरुद्ध आमदार वेंझीची पोलिसांत तक्रार; केले गंभीर आरोप

या परिसरात विकण्यात येणारे खाद्यपदार्थ आरोग्यदायी नसल्याचा अहवाल अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. हातगाड्यांसाठी पदपथालगत एक फलाट बांधून देण्यात आला आहे. मात्र, विक्रेत्यांनी पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करून परिसरात खुर्च्या, टेबल उभारून एकप्रकारे रेस्टारंट सुरू केले आहे. येथील पार्किंग जागाही त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्याने दुचाकी वाहनचालकांना वाहने उभी करता येत नाही. अन्न व औषध प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी अचानक केलेल्या तपासणीत गलिच्छपणा दिसून आला. तसेच, तेथील खाद्यपदार्थ आरोग्यदायी नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Vasco Murmugao
Dabolim News:...तर गोव्यात लवकरच तिसरे विमानतळ; पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांचे वक्तव्य

दरम्यान, नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांनी अचानक छापा टाकत अनेक विक्रेत्यांविरोधात कारवाई केली. यावेळी रॉड्रिग्स यांच्यासह पालिका बाजार समितीचे अध्यक्ष नगरसेवक विनोद किनळेकर आणि नगरसेवक नारायण बोरकर उपस्थित होते. तसेच मार्केट इन्स्पेक्टर, पर्यवेक्षक आणि कामगारांसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

रेल्वे स्थानकाच्या बाहेरील खाद्यपदार्थ अतिशय अस्वच्छ आहेत. अनेक स्टॉल्सनी गेल्या काही महिन्यांपासून त्यांची थकबाकी भरलेली नाही. तसेच, स्वच्छताही राखली नाही आणि शिवाय फूटपाथवरही अतिक्रमण केले आहे. कारवाईचा भाग म्हणून आम्ही खुर्च्या व इतर साहित्य जप्त केले आहे. थकबाकी न भरल्याने काही गाडे जप्त केले आहेत. थकबाकी भरत नाही तोपर्यंत आम्ही ते सोडणार नाही. असे रॉड्रिग्स म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com