Illegal Hill Cutting : स्वीट लेक परिसरात बेकायदेशीर डोंगर कापणी; संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

थाटले 11 हट्स : व्हिन्सेंट मास्कारेन्हस यांच्याकडून पंचायतीत तक्रार
Illegal Hill Cutting in Arambol
Illegal Hill Cutting in Arambol Dainik Gomantak

हरमल येथील वाघ कोळंब अर्थात स्वीट लेक परिसरात अज्ञाताने डोंगर कापणी करून हट्स (झोपड्या) थाटल्या आहेत. त्याप्रमाणेच सांडपाणी उघड्यावर व लेकमध्ये सोडल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक व्हिन्सेंट मास्कारेन्हस यांनी केली आहे. तसेच ग्राम जैवविविधता समितीने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन स्वीट लेकचे जतन करावे व त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे तक्रारदार मास्कारेन्हस यांनी सांगितले.

Illegal Hill Cutting in Arambol
Mid Day Meal : 'मिड डे मिल'बाबत शिक्षण संचालकांचे स्पष्टीकरण खोटे! याबाबत दुर्गादास कामत म्हणतात...

स्वीट लेकनजीकचा भाग हरमल पंचायत हद्दीत असून त्या डोंगराची कापणी करून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या झोपड्या थाटल्या आहेत. त्या भागात ११ हट्स उभारले असून आवश्यक परवाने कोणत्याही खात्याकडून घेतलेले नाहीत. या ठिकाणी त्यांनी रेस्टॉरंट थाटले असून त्यासाठी झुलता पूल उभारून स्वीट लेकच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा निर्माण केल्याचे मास्कारेन्हस यांनी सांगितले.

तक्रारीची दखल नाही

या डोंगर कापणीला परवानगी नसली तरीही सदर चालक अमित शर्मा हा स्वीट लेक नामशेष होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. झोपड्या उभारून आकर्षक परिसराची नासधूस केली आहे. कित्येक झाडांची कत्तल केली असून ही बाब वन खात्याच्या निदर्शनास आणून दिल्यास आठवडा उलटला. मात्र, तक्रारीची पोच मिळल्याव्यतिरिक्त कसलीच दखल न घेतल्याने मास्कारेन्हस यांनी संताप व्यक्त केला.

याबाबतची तक्रार पंचायतीकडे असून त्या जागेची पाहणी करण्यासाठी जाणे कठीण आहे. पंचायत सचिव रजेवर असल्याने तारीख निश्चित केली नाही. मात्र, पुढील आठवड्यात सचिव रुजू झाल्यानंतर ‘त्या’ जागेची पाहणी करून अहवाल सादर केला जाईल. ‘स्वीट लेक’ हे हरमल गावचे भूषण व पुरातन स्थान असून त्याचे संवर्धन करण्यासाठी पंचायत पातळीवरून निश्चित प्रयत्न केले जातील.

- बर्नार्ड फर्नांडिस, सरपंच, हरमल

‘स्वीट लेक वाचवा’ मोहिमेची मागणी

हरमल समुद्रकिनारा प्रसिद्ध होण्यामागे अनेकविध गोष्टी असल्या तरी ‘स्वीट लेक’ अर्थात ‘वाघ-कोळंब’ हे प्रमुख आहे. या ‘वाघ-कोळंब’चा उदय जितका कठीण तितका रोमहर्षक आहे. वाघाची वस्ती असल्याने वाघ कोळंब. मात्र, सध्या लोकवस्ती व येथील वर्दळीमुळे वाघ दिसेनासे झाले आहेत. परंतु स्वीट लेकचे जतन, संवर्धन होणे काळाची गरज असून निसर्गप्रेमींकडून ‘स्वीट लेक वाचवा’ मोहीम राबविणे आवश्यक बनल्याचे मास्कारेन्हस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com