'गोव्याच्या पूर्वसीमेवर बेकायदेशीर दारू जप्त'

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

गोव्याच्या पूर्व सीमेवरील मोले येथील तपासणी नाक्यावर साडे आठ लाख रुपयांची दारू बेकायदेशीरपणे नेताना पकडण्यात आली.

पणजी:  गोव्याच्या पूर्व सीमेवरील मोले येथील तपासणी नाक्यावर साडे आठ लाख रुपयांची दारू बेकायदेशीरपणे नेताना पकडण्यात आली. या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकही (टीएन ५७, एव्ही ४१०४) जप्त करण्यात आलेला आहे. मोले येथील तपासणी नाक्यावरून अनमोड घाट मार्गे कर्नाटकातील खानापूर येथे जाणारा रस्ता आहे. फोंडा ते खानापूर या रस्त्यावर हे तपासणी नाके आहे. या नाक्यावर तमिळनाडूत नोंदणी असलेल्या एका ट्रकची संशयावरून गोव्याच्या अबकारी खात्याच्या कर्मचार्‍यांनी तपासणी केली असता त्या ट्रक मध्ये मागील हौद्यात लपवलेली ही दारू सापडले.

"मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून आचारसंहितेचा भंग"

ही दारू खोक्यांमध्ये भरण्यात आली होती. या खोक्यांत अन्य साहित्य आहे अशी कागदपत्रे चालकाने तपासणी नाक्यावर सादर केली होती, मात्र संशयावरून केलेल्या पाहणीत या खोक्यांमध्ये  भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या. या मुद्देमालाची किंमत साडे आठ लाख रुपये आहे. अबकारी खात्याच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ कारवाई करत ट्रक वरील चालक व स्वच्छक याच्यासह ट्रक मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे.

 

संबंधित बातम्या