
Sand Extraction : पीर्णा-बार्देश येथील शापोरा नदीत बेकायदा रेती उत्खनन करणार्या दोन मजुर कामगारांना अटक करीत होडी जप्त करण्यात आली. कोलवाळ पोलिसांनी मामलेदार व खाण खात्याच्या अधिकार्यांसमवेत ही कारवाई केली. उपलब्ध माहितीनुसार, ही कारवाई दि. 13 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता करण्यात आली.
शापोरा नदीत बेकायदेशीररित्या रेती उत्खनन होत असल्याची माहिती तपास यंत्रणांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार कोलवाळ पोलिस, बार्देशचे मामलेदार दशरथ गावस, खाण खाते व बंदर कप्तानच्या अधिकार्यांनी संयुक्तरित्या छापा टाकला. त्यावेळी पीर्णा येथे शापोरा नदीच्या पात्रात दोन संशयित हे होडीच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करीत असल्याचे रंगेहाथ सापडले.
दादन सहानी (50) व अजय सहानी (42) हे दोघेही संशयित कामगार मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यांनी 08.5 मीटर क्युबिक रेती उत्खनन केली होती, ज्याची किंमत 11050 इतकी होती. याप्रकरणी खाण विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक श्याम सावंत यांच्या तक्रारीनुसार, कोलवाळ पोलिसांनी रेतीच्या चोरीप्रकरणी भादंसंच्या 379 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच गोवा खनिज नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांही संशयितांना अटक केली. तसेच चोरीसाठी वापरलेली होडी जप्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.