आमोणे, न्हावेलीत बेकायदा रेतीसाठा जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

विशेष भरारी पथकाने आज (सोमवारी) डिचोली तालुक्‍यातील आमोणे आणि न्हावेली येथे संयुक्‍तरित्या छापा टाकून बेकायदेशीरपणे उत्खनन केलेला रेतीसाठा जप्त केला.

डिचोली :  विशेष भरारी पथकाने आज (सोमवारी) डिचोली तालुक्‍यातील आमोणे आणि न्हावेली येथे संयुक्‍तरित्या छापा टाकून बेकायदेशीरपणे उत्खनन केलेला रेतीसाठा जप्त केला. कायदेशीर सोपस्कार केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जवळपास १०२ क्‍यूबीक मीटर रेती मांडवी नदीच्या पात्रात टाकण्यात आली. डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने ही कारवाई केली. या भरारी पथकात खाण खात्याचे सहायक भूगर्भतज्ञ सूरज कळंगुटकर, डिचोली मामलेदार कार्यालयातील सर्कल निरीक्षक सहदेव मोटे, तलाठी गौरीश नाईक आदींचा समावेश होता. या कारवाईमुळे तालुक्‍यात बेकायदेशीरपणे रेती उत्खनन चालू असल्याचे स्पष्ट होत आहे. आजच्या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

संबंधित बातम्या