सोलापूरहून गोव्याला अवैधरित्या रेड्याची तस्करी

सोलापूर ते गोवा रेडा घेऊन आलेले वाहन पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून राय येथून ताब्यात घेतले
सोलापूरहून गोव्याला अवैधरित्या रेड्याची तस्करी
Crime Dainik Gomantak

सासष्टी ता 3 (प्रतिनिधी): सोलापूर ते गोवा अवैधरित्या रेड्याची तस्करी (Illegal smuggling of Buffalo) केल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय भगवा हिंदू वाहिनी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा तक्रारदार असून रेड्याची तस्करी होत असल्याची माहिती ध्यान फाउंडेशनने (Dhyan Faoundation) पोलिसांना दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

सविस्तर माहितीनुसार सोलापूर ते गोवा रेडा घेऊन आलेले वाहन पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून राय येथून ताब्यात घेतले. सोलापूरहुन हा रेडा आणण्यासाठी वाहन चालक देविदास कोल्हे यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याचे पोलिसांना तापसकामात आढळून आले आहे. पोलिसांना ही माहिती ध्यान फाउंडेशनने दिली होती. त्यानंतर झा यांनी तक्रार दाखल केली असता, मायणा कुडतरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केल्यावर रेड्याची सुटका करण्यात आली. हा रेडा सध्या ध्यान फाउंडेशनच्या गौशाळेमध्ये सुरक्षित आहे.

Crime
Goa: पावाच्या किंमतीवरून लोकांमध्ये संभ्रम

मायणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्यावर राय येथील बेनी यांनी पोलीस ठाण्यात येऊन हा रेडा शेतीकामासाठी आपण या बैलाला १ लाख २० हजार रुपयांमध्ये विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. शिवाय बेकायदेशीररित्या व्यक्तींनी गौशाळेमध्ये प्रवेश करून सदर रेड्याला नेण्यासाठी धमकावल्याचाही प्रकार समोर आल्याने याप्रकरणी फाउंडेशनने केपे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला आहे.

Related Stories

No stories found.