न्यायालयाचा आदेश झुगारून पदपथावर विक्रेत्यांची दुकाने

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

वास्को शहरातील देशपांडे मार्गावरील जुन्या भाजी मार्केट इमारतीला लागून असलेल्या पदपथावर एकूण २९ दुकाने होती.तीच दुकाने २५ वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार हटविण्यात आली होती.

मुरगाव: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशाचे पालन करुन वास्को येथील पदपथावर उभारलेली दुकाने हटविण्यात आली होती पण,आता त्याच पदपथावर रस्ता विक्रेत्यांनी दुकाने थाटून पदपथ बळकावण्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी पालिकेकडे तक्रारी करुन सुद्धा कोणतीच कारवाई केली जात नाही.

वास्को शहरातील देशपांडे मार्गावरील जुन्या भाजी मार्केट इमारतीला लागून असलेल्या पदपथावर एकूण २९ दुकाने होती.तीच दुकाने २५ वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार हटविण्यात आली होती.

या हटविलेल्या सर्व दुकानांना माॅडर्न मार्केटमध्ये जागा देण्यात आलेली आहे.पण, दुकाने हटवून मुक्त केलेल्या त्या पदपथावर सद्या मोठ्या प्रमाणात रस्ते विक्रेत्यांनी आपला व्यवसाय थाटल्याने पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा झालेलाच नाही असे चित्र दिसून येते.

वास्को शहर परिसरात पदपथ आणि रस्त्यावर बसून मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जात आहे.सद्यस्थितीत मासे विक्रेत्यांनी रस्ते पदपथ बळकावले आहेत.फळभाजी विक्रेतेही ठिकठिकाणी दिसून येत आहे.यामुळे वास्को शहरात बकाल अवस्था पसरली आहे.यासंबंधी पालिकेचे लक्ष वेधून सुद्धा कारवाई केली जात नाही.

संबंधित बातम्या