Fire in Goa : IMD ने स्पष्ट केले आगींमागचे कारण! शास्त्रज्ञ राहुल एम यांनी नमूद केल्या 'या' महत्वाच्या गोष्टी

काही दिवसांपासून गोव्यात जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे.
Fire in Goa | Goa Forests Fire Reason
Fire in Goa | Goa Forests Fire ReasonDainik Gomantak

Goa Forests Fire Reason : काही दिवसांपासून गोव्यात जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. मागील 96 तासांत नोंदवलेल्या आगीशी संबंधित 208 घटनांपैकी 178 घटना सुके गवत, काजूच्या मळ्यासह शेतजमीन, टेकड्या आणि अगदी म्हादई वन्यजीव अभयारण्य जळून खाक झाल्यामुळे अग्निशमन दलासाठी या घटना आव्हानात्मक बनल्या आहेत.

खरेतर किनारपट्टीलगत राज्य असल्याने गोव्यात फेब्रुवारीमध्ये सौम्य हिवाळा असणे अपेक्षित होते मात्र या दिवसात गोव्यात खूप प्रमाणात उष्णता जाणवली.

Fire in Goa | Goa Forests Fire Reason
Panaji Smart City : ‘स्मार्ट' पणजीची रोजच ‘कोंडी’ ! सुटका कधी ?

गोव्यातील अनेक भाग सध्या उष्णतेच्या कडाक्याखाली आहेत. अशा घटना गोव्यात कदाचित पहिल्यांदाच घडत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आगीच्या घटनांसाठी कमी आर्द्रतेसह उच्च तापमान हे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.

IMD शास्त्रज्ञ राहुल एम यांनी गोव्यातील खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, तापमान ही पूर्णपणे अनैसर्गिक गोष्ट नाही. आपण यापूर्वीही याचा अनुभव घेतला आहे, परंतु यावेळी नक्कीच सर्वाधिक तापमान वारंवार जाणवले आहे. फेब्रुवारी महिना तुलनेने जास्त उष्ण होता. 20-30 टक्के आर्द्रता कमी असण्यामुळे कदाचित कोरडे गवत आणि जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

गोव्यात एका दिवसात कोरडे गवत आणि शेतात आग लागण्याच्या सरासरी 23 घटनांची नोंद झाली आहे. तापमानात झालेली वाढ आणि कमी आर्द्रता यामुळे कोरड्या गवतांना आग लागली असल्याचे राहुल यांनी सांगितले. सकाळी 5 ते 7 या दरम्यान आर्द्रतेचे मूल्य जास्त असते जिथे ते दुपारनंतर सुमारे 20-30 टक्क्यांपर्यंत घसरते. तसेच जानेवारी ते मार्च या महिन्यांत आर्द्रता कमी असते.

IMD च्या मार्च ते मे 2023 साठीच्या दीर्घ-श्रेणीचा अंदाजानुसार, उत्तर गोव्याच्या बहुतेक भागांमध्ये सामान्य कमाल तापमानाची उच्च संभाव्यता असेल तर दक्षिण गोव्याच्या काही भागांमध्ये सामान्य कमाल तापमानाची उच्च संभाव्यता असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com