राज्यात उकाडा आणखी वाढणार; IMD ने वर्तवला अंदाज

तसेच येत्या 48 तासांत कमाल तापमानात 1-2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात उकाडा आणखी वाढणार; IMD ने वर्तवला अंदाज
Goa Weather UpdatesDainik Gomantak

गोवा: राज्यात उष्णतेची लाट आली असून राज्यात उकाडा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने काही अंशी गारवा निर्माण झाला होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यात उकाडा बऱ्याच प्रमाणात वाढला आहे. गोवा हावामान खात्याने अंदाज वर्तवला असुन, उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये 5 दिवस हवामान सामान्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 48 तासांत कमाल तापमानात 1-2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

(IMD forecast summer will increase further in Goa state)

Goa Weather Updates
वीज खात्याच्या लेखी 'लोहिया मैदान' बेवारस का?

भारतात यावर्षी एप्रिल महिन्यातच उष्णतेने इतके भयंकर रूप दाखवले की, मागील 112 वर्षांचा विक्रम जळून खाक झाला. भारतीय हवामान खात्याने दर महिन्याला जारी केलेल्या हवामान आणि हवामान अहवालात असे नमूद केले आहे की, या वर्षी एप्रिलमध्ये सरासरी कमाल तापमान 35.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर साधारणपणे 33.94 अंश सेल्सिअस असते.

1901 नंतर गेल्या दहा वर्षात ही तिसरी वेळ

1901 नंतर गेल्या दहा वर्षात ही तिसरी वेळ आहे जेव्हा एप्रिल महिन्याचे सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. यापूर्वी 2010 मध्ये मासिक सरासरी कमाल तापमान 35.42 होते. त्यानंतर 2016 मध्ये हे तापमान 35.32 होते.

देशात उन्हाळ्याच्या महिन्यांची संख्या वाढत आहे.

देशात उन्हाळ्याच्या महिन्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी, उष्ण वाऱ्यांनी कॅनडात इतका कहर केला होता की काही भागात तापमान 50 अंशांपर्यंत पोहोचले होते. असेच काहीसे यावेळी भारतात पाहायला मिळणार आहे. यंदा उत्तर भारतात पारा 50 अंशांच्या वर जाण्याचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.