आयएमएच्या मार्गदर्शनाचा घरीच उपचार घेणाऱ्या ४२०० कोविड रुग्णांना लाभ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

आयएमए गोवा शाखेकडे मुरगाव, मडगाव, बार्देस, डिचोली, तिसवाडी, कुडचडे, केपे, सांगे येथील मिळून १५०डॉक्टर सदस्य आहेत. गेल्या महिनाभरात कोविड १९ रुग्णांना १७ दिवसांच्या विलग्नवास काळात काय वैद्यकीय उपचार घ्यावेत याची वेळोवेळी माहिती पुरवली व सल्ले  दिले.

फातोर्डा: इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) गेला एक महिनाभर गोव्यात कोविड-19 रुग्ण जे आपल्या घरीच उपचार घेत आहेत, अशासाठी दूरसंचारवरून सल्ला देण्याची मोहीम राबविली. या मोहिमेचा ४२०० रुग्णांना फायदा झाला, असे आयएमए गोवाचे अध्यक्ष डॉ. एस सॅम्युअल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

या पैकी ३८ रुग्णांना जवळच्या कोविड केंद्रांमध्ये पाठविण्यात आले. चौघांना इएसआय हॉस्पिटलात व सहा रुग्णांना जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. आयएमएने त्याशिवाय ओशियानिक रेझिडेन्सी, कोलवा, ओशियानिक वेलनेस सांगोल्डा व प्लानाट होलिवुड उतोर्डा येथे कोविंड केंद्रे सुरु केली. आयएमए गोवा शाखेकडे मुरगाव, मडगाव, बार्देस, डिचोली, तिसवाडी, कुडचडे, केपे, सांगे येथील मिळून १५०डॉक्टर सदस्य आहेत. गेल्या महिनाभरात कोविड १९ रुग्णांना १७ दिवसांच्या विलग्नवास काळात काय वैद्यकीय उपचार घ्यावेत याची वेळोवेळी माहिती पुरवली व सल्ले  दिले.

या कामात आयएमएला इंडियन डेंटल असोसिएशन गोवाचे सहकार्य लाभले. आयएमएच्या वतीने रुग्णांना वैद्यकीय सामुग्री कमीत कमी किंमतीत पुरविण्यात आली. 

सल्लागार मंडळात डॉ. राजेश नाईक, डॉ. अनिल मेहेन्द्रिता, डॉ. संदीप नाईक, डॉ. राजेश जवेरानी, डॉ. शेखर साळकर, डॉ. सुधीर शेट, डॉ. सुरज प्रभुदेसाई, डॉ. सर्वेश दुभाषी, डॉ. प्रज्ञा काकोडकर, डॉ. प्रणय बुडकुले, डॉ. मालिसा यांचा समावेश आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या