Usgaon Parent Protest: "आमका नाका मोबाईल टॉवर" - पालकांनी दिलाय 'हा' इशारा

शाळेच्या जागेव्यतिरिक्त अन्यत्र हा टॉवर बांधावा - पालकांची मागणी
Mobile Tower
Mobile TowerDainik Gomantak

Usgaon Parent Protest उसगाव तिस्क इंदिरानगर नजीकच्या शाळेसमोर एका मोबाईल कंपनीमार्फत टॉवर बांधण्याचे काम सुरु करण्यात आले असून या टॉवर बांधणीला येथील स्थानिकांचा आणि पालकांचा विरोध आहे. टॉवर बांधणीचे काम जोपर्यंत थांबवत नाही तो पर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा पालकांनी घेतलाय.

मागील दोन दिवसांपासून सदर टॉवरचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या टॉवरपासून मुलांच्या आरोग्याला कोणताही धोका नाही असे सरकारने लेखी पत्राद्वारे द्यावे अन्यथा मुलांना शाळेत आम्ही पाठवणार नसल्याचे येथील पालकांचे म्हणणे आहे.

मध्यंतरी काही वर्ष शाळेचे कामकाज अपुऱ्या शिक्षकांअभावी मंदावले होते. तसेच शाळेची पटसंख्या वाढावी म्हणून परिसरातील लोकांनी मुलांना एकत्रित केले होते. तसेच शाळेत विविध उपक्रम देखील राबवण्यात येऊ लागले होते.

एकंदरीत शाळेचा विकास होत असताना अचानक सरकारने शाळेसमोर टॉवर बांधण्याचा जो निर्णय घेतलाय तो दुर्दैवी आहे. या शाळेच्या जागेव्यतिरिक्त अन्यत्र हा टॉवर बांधावा असे पालकवर्गाचे म्हणणे आहे.

Mobile Tower
IMD Goa: येत्या दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता

या शाळेची दुमजली इमारत असून सध्या शाळेत सुमारे 70 ते 80 मुलं शिकत आहेत. शाळेलगतच टॉवर उभारला जात असल्याने टॉवरच्या रेडिएशनमुळे मुलांच्या आरोग्यावर फार घातक परिणाम होऊ शकतो अशी चिंता पालकांनी व्यक्त केलीय.

तसेच या बांधकामासाठी संबधितांनी शाळा समितीसह कुणालाच विश्वासात घेतले नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हा टॉवर जोपर्यंत या जागेतून अन्यत्र ठिकाणी नेत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा पालकांनी घेतलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com