गोव्यात दीड दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन
Ganesh ImmersionDainik Gomantak

गोव्यात दीड दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन

दीड दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. कोरनामुळे (Covid 19) यंदा बहुतांश घरात तसेच सार्वजनिक गणेश उत्सव दिड दिवसापर्यंत मर्यादित ठेवण्यात आला होता.

दीड दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. कोरनामुळे (Covid 19) यंदा बहुतांश घरात तसेच सार्वजनिक गणेश उत्सव दिड दिवसापर्यंत मर्यादित ठेवण्यात आला होता. त्यानुसार आज गणरायाचे विसर्जन करण्यात आले. तर काही गणपती पाच, सात, नऊ, अकरा दिवस राहणार आहेत.

काल थाटामाटात आगमन झालेल्या गणरायाचे आज दीड दिवसांच्या पूजनानंतर जड अंतकरणाने विसर्जन करण्यात आले. गेल्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनामुळे विरजण पडले होते. तर यंदा मात्र करोनामुळे थोडीशी उसंत मिळाल्याने बालगोपाळा समवेत अबाल वृध्दांनी आवश्यक खबरदारी घेऊन आपला गणेशोत्सव साजरा करण्यास पुढे सरसावले व त्यानुसार गणपतीची सेवा केली.

Ganesh Immersion
Goa: गणेशभक्ताला मिळाली गणपती सदृश्य आकाराची पपई

दरम्यान सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. काहींनी दिवसाला विसर्जन केले. तर काहींनी रात्री उशिरा विसर्जन केले. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही मिरवणुका निघाल्या नाहीत. तसेच दारूकामाची आतषबाजी कमी जाणवली. पण भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com