खाणबंदीमुळे शैक्षणिक सुविधांवर परिणाम

वार्ताहर
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

सन   २०१२ व त्यानंतर २०१८  नंतर गोव्यातील खाण कंपनीचे काम बंद झाल्यानंतर त्याचे प्रतिकूल परिणाम अनेक क्षेत्रावर उमटलेले आहेत. सत्तरी तालुक्यातील होंडा, पिसुर्ले  व भिरोंडा या तीन पंचायत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज व्यवसाय सुरू होता.

 पिसुर्ले:  सन   २०१२ व त्यानंतर २०१८  नंतर गोव्यातील खाण कंपनीचे काम बंद झाल्यानंतर त्याचे प्रतिकूल परिणाम अनेक क्षेत्रावर उमटलेले आहेत. सत्तरी तालुक्यातील होंडा, पिसुर्ले  व भिरोंडा या तीन पंचायत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज व्यवसाय सुरू होता. यामुळे प्रचंड प्रमाणात फायदा वेगवेगळ्या  माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध होत होता. आता हा खनिज व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्यानंतर त्याचे प्रतिकूल परिणाम वेगवेगळे क्षेत्रावर दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक स्तराचा विचार केल्यास आज मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाला ब्रेक लागण्याची चित्र पहावयास मिळत आहे . या तिन्ही पंचायत क्षेत्रातील शैक्षणिक विकासाच्या संदर्भात खनिज खाणींचे योगदान महत्त्वाचे होते. मात्र 2012 व त्यानंतर 2018 नंतर बंद झालेला खनिज व्यवसायामुळे याचा शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत परिणाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

 सदर खाण क्षेत्रातील कंपन्या मुलांसाठी वेगवेगळ्या शाळेमध्ये जाण्यात करिता आवश्यक स्वरूपात असलेली वाहतुकीची व्यवस्था खाण कंपनीकडून करण्यात येत होती. सेसा गोवा, फोमेंतो दामोदर मंगलजी,  आर एस शेटये, साळगावकर या कंपनीकडून महत्त्वाचे योगदान देण्यात येत होते. सोनशी, पिसुर्ले, अडवई आदी भागातील मुलांकरिता ही वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी या वाहतुकीच्या निमित्ताने मुलांना चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध होती. सदर व्यवस्था खाण कंपन्याकडून मोफत करण्यात आली होती. सध्या खाणीचे काम बंद झाल्यानंतर मुलांसाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झालेली आहे. यामुळे मुलांना आता स्वतःच्या वाहनाच्या माध्यमातून शाळा व कॉलेज गाठावे लागत आहेत. अनेक पालकांची आपल्या मुलांना शाळेमध्ये पोचविण्याची वाहतूक व्यवस्था करणे एवढे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत झालेले पहावयास मिळत आहे. अनेक गावातील मुले आज शाळेपासून वंचित राहात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जोपर्यंत खनिज खाणींचा व्यवसाय पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत शैक्षणिक विकासाला मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार कंपन्यांकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून ही वाहतूक व्यवस्था करण्यावर भर देण्यात येत होती. ज्या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था नाही सदर भागातून खाण कंपनीकडून ही व्यवस्था करण्यात येत होती .आता सदर व्यवस्था बंद झाल्यामुळे त्याचे प्रतिकूल परिणाम मुलांच्या सुविधावर होऊ लागले आहेत.

खाण परिसरातील सरकारी व खासगी शाळांसाठी खाण कंपन्यांकडून वेगवेगळ्या उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होत होता .आता हा व्यवसाय बंद झाल्यामुळे हा निधी सुद्धा बंद झालेला आहे .होंडा ,पिसुर्ले आदी शाळांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून कंपनीकडून निधी पुरविण्यात येत होता.पिसुर्ले येथील शाळेसाठी वर्गांचे सुशोभीकरण प्रयोगशाळेसाठी आवश्यक स्वरूपाची साधनसामुग्री अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येत होती. खाण कंपनीचे काम बंद झाल्यापासून अशा सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे ब्रेक लागलेला आहे. यामुळे जोपर्यंत या खाण कंपन्या सुरू होत नाही तोपर्यंत शैक्षणिक व्यवस्था व सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून खाण कंपन्यांचे लाभलेले योगदान याची कमतरता निश्चित प्रमाणात समोर येणार आहे. यामुळे गोवा सरकारने खाण कंपन्यांच्या व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी विशेष योगदान देणे अत्यंत गरजेचे असून तसे न झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम येणाऱ्या काळात शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून होणार आहे.

संबंधित बातम्या