Global warming: जागतिक तापमानवाढीचा गोवा किनारपट्टीवर परिणाम

मोबोरला किमान 20 मीटर धूप
Goa coast
Goa coastDainik Gomantak

मडगाव: जागतिक तापमानवाढीचा विपरीत परिणाम गोव्याच्या किनारपट्टीवर दिसू लागला असून मोबोर किनारपट्टीची यावर्षी किमान 20 मीटर धूप झाली आहे. पर्यावरणा विषयी जागृती करणारे स्थानिक मच्छीमार रॉय बार्रेटो यांनी याबद्दल माहिती देताना गेल्यावर्षाच्या तुलनेत हा किनारा किमान 20 मीटर मागे गेला असल्याचे सांगितले.

(Impact of global temperature rise on Goa coast)

Goa coast
मराठी भाषा प्रसारासाठी महाराष्ट्र व गोवा सरकार येणार एकत्र

किनारा किमान 20 मीटर मागे जाणे हे भविष्यासाठी ही धोक्याची सूचना आहे. किनारपट्टीची धूप झाल्याने किनाऱ्यावरील अनेक झाडे यंदा भुईसपाट झाल्याचे ते सांगितले. गेल्या महिन्यात गोव्यात पाच दिवस मुसळधार पाऊस पडला त्यावेळी पहिल्यांदाच गावात पाणी शिरले, असे बार्रेटो यांनी सांगितले. या किनाऱ्यावर दगडी भिंत उभारून या किनाऱ्याची हानी रोखणे गरजेचे आहे.

Goa coast
सांताक्रुज येथील तलावात भल्यामोठ्या मगरीचा थरार

जागतिक तापमानवाढीचा पुरावा काय ?

गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीचं सरासरी तापमान 0.8 डिग्रीनं वाढलं आहे आणि यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या तीन दशकातच 0.6 डिग्रीनं तापमान वाढलं आहे. सॅटेलाइटचा डेटा असं दाखवतो की अलीकडच्या दशकात सागरी पातळीत 3mm ची वाढ झाली आहे. उष्णतेमुळे पाण्याचं प्रसरण होतं त्यातून ही पातळी वाढल्याचं निदर्शनास आलं आहे.

हिमनग वितळणं आणि हिमखंड वितळणं हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे. अंटार्टिकातला तसेच जगातल्या इतर भागातला बर्फ वितळत आहे. 1979 पासून आर्टिक महासागरातली हिमक्षेत्र सातत्यानं कमी होत आहे. हिमक्षेत्र वर्षाला सरासरी चार टक्क्यांनी कमी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com